पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार? या 5 कारणांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली
देशाच्या राजधानीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना लक्षात घेता नाईट कर्फ्यू लावण्याची चर्चा आहे.
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सरकारसह लोकांमध्ये चिंता वाढत आहे. खरंतर, महाराष्ट्रात लॉकडाउन आणि अनेक शहरांमध्ये रात्रीच्या बंदीनंतर संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती लोकांना वाटत आहे. दुसरीकडे, देशाच्या राजधानीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना लक्षात घेता नाईट कर्फ्यू लावण्याची चर्चा आहे. गेल्या वेळी लॉकडाऊनमुळे उद्योग, लोकांच्या व्यवसायासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम झाला होता, आता लोक हळू हळू सावरत आहेत. पण आता पुन्हा लॉकडाऊन घातल्यास काय होईल याची चिंता सर्वसामान्यांना वाटत आहे. (Coronavirus Lockdown violation know how lockdown effects in april month)
छोटे व्यवसाय बंद होण्याची भीती
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका छोट्या दुकानदार आणि लघुउद्योगांवर होणार आहे. याआधीच्या लॉकडाऊनमध्येही या प्रकाराचा सर्वाधिक परिणाम झाला होता. फक्त दिल्ली एनसीआरबद्दल बोलायचे झाले तर लॉकडाऊनमधील जवळपास 10 टक्के लघु उद्योग बंद झाले. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन झालं तर सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
नोकरीचा धोका
लॉकडाऊन पुन्हा झालं तर त्याचा फटका कामगार वर्गालाही सहन करावा लागू शकतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी, सीएमआयईच्या आकडेवारीनुसार गेल्या वेळी लॉकडाऊनमध्ये कोट्यवधी लोकांनी नोकरी गमावली. फक्त 2020 च्या जुलै महिन्यात जवळपास 50 लाख लोकांच्या नोकर्या गमावल्या. ज्यामुळे कोरोना व्हायरस साथीच्या आणि लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या 1.89 कोटींवर पोहचली आहे. त्याच वेळी एप्रिल 2020 मध्ये 1.77 कोटी लोकांच्या नोकर्या गमावल्या आणि मेमध्ये जवळपास 1 लाख लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या.
अर्थव्यवस्थेवर संकट
लॉकडाउननंतर, इकॉनॉमी व्हील हळू हळू रिकव्हरी मोडकडे परत येत आहे. परंतु पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जीडीपी, मॅन्युफॅक्चरिंग, उद्योगाच्या वेगासह सर्व महत्वाच्या बाबींवर परिणाम होईल ज्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. लॉकडाऊनमुळे देशाची जीडीपी नकारात्मक झाली होती. जी आता हळू हळू सकारात्मकतेत येत आहे.
वेतनवाढीवर परिणाम
लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम त्या कर्मचार्यांवरही होऊ शकतो, ज्यांची नावनोंदणी मागील वर्षातदेखील झाली नव्हती. खरंतर, अशा नोकरदार यावर्षी वाढीची अपेक्षा करत आहेत. यावर्षी पगार वाढेल पण पुन्हा लॉकडाऊन झालं तर मात्र नागरिकांसाठी हा मोठा धक्का असणार असणार आहे.
लग्नसराई थांबेल…
गेल्या वेळी लॉकडाउन होता तेव्हा एप्रिलमध्ये लग्न करण्याचा हंगाम होता. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरंतर, हा व्यवसाय हंगामी आहे. आता लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे आणि लोकांनी प्री बुकिंग केली आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनसारखा निर्णय घेतल्यास काय होईल याची त्यांना आता भीती आहे. (Coronavirus Lockdown violation know how lockdown effects in April month)
संबंधित बातम्या –
Gold Price Today : एक महिन्यात सगळ्यात महाग झालं सोनं, पटापट चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
फक्त 10 हजारात घर बसल्या सुरू करा ‘हा’ बिझनेस, प्रत्येक महिन्याला बक्कळ पैसा कमवाल
UPI व्यवहार झाला रद्द तर बँक रोज देईल 100 रुपये, इथे करा तक्रार