शेअर बाजारात कोसळधार; पण Paytm थांबता थांबेना, 5 महिन्यातच गुंतवणूकदार मालामाल, मग पुढे काय होणार?

Paytm Share Hike : पेटीएमचे शेअर गेल्या 5 महिन्यात 120 टक्क्यांनी उसळले. या कामगिरीने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ब्रोकरेज हाऊस सिटी कंपनीने पेटीएम शेअरवर नशीब आजमावण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने बाजारातील चढउतारातही पेटीएमच्या शेअरसाठी 900 रुपयांचे टार्गेट दिले आहे.

शेअर बाजारात कोसळधार; पण Paytm थांबता थांबेना, 5 महिन्यातच गुंतवणूकदार मालामाल, मग पुढे काय होणार?
पेटीएमची दामदार कामगिरी
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 12:14 PM

भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना या महिन्यात सातत्याने झटके दिले. बाजारात कोसळधार सुरू आहेत. या पडझडीच्या सत्रातही पेटीएम शेअरने जलवा दाखवला आहे. पेटीएमचे शेअर गेल्या पाच महिन्यात 120 टक्क्यांहून अधिकने उसळले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये भविष्यात पण मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. RBI ने कारवाई केल्यानंतर पेटीएममध्ये मोठी पडझड झाली होती. पण आता पेटीएमने राखेतून पुन्हा भरारी घेतली आहे. ब्रोकरेज हाऊस सिटीने (Citi) पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे रेटिंग अपग्रेड केले आहे. सिटीने गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी पेटीएम शेअर विक्रीचा सल्ला दिला होता.

900 रुपयांचे टार्गेट प्राईस

ब्रोकरेज हाऊस सिटीने पेटीएमच्या शेअरचे टार्गेट प्राईस 100 टक्क्यांहून अधिकने वाढवले आहे. सिटीने पेटीएमचे शेअर येत्या काही दिवसात 900 रुपयांवर पोहचतील असे भाकित केले आहे. ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी या शेअरला 440 रुपयांचे टार्गेट दिले होते. सध्या 778.50 रुपयांवर आहे. तर या शेअरने 52 आठवड्यातील 952.60 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. तर या कंपनीची 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 310 रुपये अशी आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचे मार्केट कॅप 48,477 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

हे सुद्धा वाचा

5 महिन्यात 120 टक्क्यांहून अधिकने घेतली उसळी

पेटीएमच्या शेअर्सनी गेल्या 5 महिन्यात 120 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कंपनीचे शेअर 24 मे 2024 रोजी 340.95 रुपयांवर होते. पेटीएम शेअर आज 24 ऑक्टोबर रोजी 778.50 रुपयांच्या जवळपास आहे. गेल्या 6 महिन्यात पेटीएमच्या शेअरमध्ये जवळपास 98 टक्के उसळी दिसली. तर पाच महिन्यात या शेअरने 120 टक्क्यांहून अधिकची भरारी घेतली. तर या वर्षात पेटीएमच्या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांहून तेजी दिसली. पेटीएमचा आयपीओ 8 नोव्हेंबर 2021 रोजी उघडला होता. 18 नोव्हेंबर 2021 रोजी हा शेअर बीएसईवर 1955 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.