क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून नियम बदलणार
सध्या कोणतेही व्यवहार करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डसचा वापर सर्रास केला जातो. | contactless card
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल पेमेंटच्या (Digital Payment) व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात या सगळ्याला अधिकच चालना मिळाली. त्यामुळे सध्या कोणतेही व्यवहार करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डसचा वापर सर्रास केला जातो. (New rules for Credit and Debit contactless card)
मात्र, 1 जानेवारीपासून डेबिड आणि क्रेडिट कार्डसच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कॉन्टॅक्टलेस कार्डसाठी (Contactless Card Payment) नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डसद्वारे कोणत्याही पिन क्रमांकाशिवाय व्यवहार करण्याची मर्यादा पाच हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पिन क्रमांकाशिवाय डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन केवळ 2000 रुपयांपर्यंतचेच व्यवहार करण्याची मुभा होती.
काय आहे कॉन्टॅक्टलेस कार्ड?
आतापर्यंत आपण क्रेडिट किंवा डेबिड कार्डने पेमेंट करताना कार्ड हे PoS मशीनमध्ये टाकून स्वाईप केले जायचे. यानंतर तुम्हाला मशीनवर पिन क्रमांक टाकावा लागत होता. पिन टाकल्यानंतर तुमच्या कार्डमधून पैसे वळते होत असत. मात्र, कॉन्टॅक्टलेस कार्डमध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक स्ट्रिप आणि NFC अँटिनामुळे कार्ड स्वाईप करण्याची गरज उरलेली नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फक्त PoS मशीनवर धरल्यासही तुमच्या खात्यातून पैसे वळते होतात.
मात्र, या व्यवहारातील धोका लक्षात घेऊन सुरुवातीच्या काळात कॉन्टॅक्टलेस कार्डच्या पेमेंटसाठी दोन हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, 1 जानेवारीपासून ही मर्यादा 5 हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे.
एटीएम कार्डमध्येही ही सुविधा आहे का?
अलीकडच्या काळात बँकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक डेबिट कार्डात कॉन्टॅक्टलेस कार्डची सुविधा असते. तुमच्या कार्डात ही सुविधा असेल तर कार्डच्या वरच्या भागात डाव्या बाजूला वायफाय नेटवर्कचा लोगो असेल.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही, RBIचे निर्बंध
SBI च्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी खुशखबर
क्रेडिट कार्ड वापरताय? हे नियम माहित असू द्या
(New rules for Credit and Debit contactless card)