नवी दिल्ली : आतंररारष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सातत्याने कमी होत आहेत. कच्च्या तेलाच्या किमीतमध्ये गेल्या दोन दिवसांत तब्बल 11.55 टक्क्यांनी घट झाली असून, त्याचे दर 72.72 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. युरोपमध्ये अद्यापही कोरोनाचे सावट कायम असल्याचे पहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलाचे भाव घसरल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान जरी कच्च्या तेलाचे भाव घसरले असले तरी देखील भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत
Multibagger Penny Stock: 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा, 1 लाख रुपयांचे झाले 13 लाख