‘या’ देशात सापडला सोन्याचा प्रचंड साठा; तुम्हीदेखील मिळवू शकता सोनं
Gold | 2020 मध्ये एका कंपनीकडून या परिसराचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले. हे सर्वेक्षण आणखी तीन वर्षे चालेल. त्यानंतर या सोन्याचे काय करायचे, हा निर्णय घेतला जाईल.
चेक रिपब्लिक हा जगातील सुंदर देशांपैकी एक मानला जातो. त्यामुळे पर्यटकांच्या यादीत चेक रिपब्लिक अग्रस्थानी आहे. मात्र, आता आणखी एका गोष्टीमुळे चेक रिपब्लिक प्रचंड चर्चेत आला आहे. कारण येथील इयोव प्रांतात सोन्याचे प्रचंड साठे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रांताची लोकसंख्या अवघी 5 हजार इतकी आहे. मात्र, सोन्याचा साठा असल्याच्या वृत्तानंतर हा प्रदेश प्रचंड चर्चेत आहे.
14 व्या शतकात रोमच्या शाही परिवाराकडून याच प्रदेशातून सोने काढले जायचे, असे सांगितले जाते. प्राग शहराच्या बांधणीत हेच सोने वापरले गेल्याचाही अंदाज आहे. इयोव प्रांतात ज्याठिकाणी सोन्याचे साठे असल्याची चर्चा आहे त्याठिकाणी एक संग्रहालय आहे. याठिकाणी पर्यटकांनी तिकीट काढल्यानंतर त्यांना संबंधित परिसरातील सोने मिळवण्याची संधी मिळू शकते. या संग्रहालयात एक मोठा तलाव आहे. या तलावातील रेती चाळून पर्यटक सोने मिळवू शकतात. 1968 पासून या परिसरातील सोन्याचे उत्खनन बंद करण्यात आले होते.
सोन्याचा प्रचंड साठा
चेक रिपब्लिकमध्ये सोन्याच्या अनेक खाणी असल्याचा अंदाज आहे. या खाणींमध्ये 400 मॅट्रिक टन सोने असल्याचा अंदाज आहे. 1990 पासून अनेकदा याठिकाणी खाणी सुरु करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. 2020 मध्ये एका कंपनीकडून या परिसराचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले. हे सर्वेक्षण आणखी तीन वर्षे चालेल. त्यानंतर या सोन्याचे काय करायचे, हा निर्णय घेतला जाईल.
इतर बातम्या
Generic Aadhaar ची फ्रेंचायजी सुरु करा आणि बक्कळ पैसे कमवा
PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या
ना कार्ड, ना पैसे, आता थेट FASTag द्वारे पेट्रोल भरता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया?
(Czech republic gold reserves in earth found)