DA मध्ये पुन्हा वाढ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांपर्यंत फायदा; जाणून घ्या

Central Government employees : वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या ज्ञापनात असे म्हटले आहे की, ही वाढ 15 जुलै 2021 पासून प्रभावी मानली जाईल. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, ज्यांना पगार दिला जातो, तो मूळ वेतनाच्या 189 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आलाय.

DA मध्ये पुन्हा वाढ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांपर्यंत फायदा; जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 10:33 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) काही सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा दिवाळीची भेट (Diwali Gift) दिलीय. खरं तर केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोगाच्या (6th pay commission) शिफारशींनुसार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या (5th pay commission) शिफारशींनुसार महागाई भत्ता (DA Hike) वाढवण्यात आलाय.

कोणाचा महागाई भत्ता किती वाढला?

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Govt Employees) महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. त्याचवेळी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय स्वायत्त संस्था (CAB Employees) पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

वाढ केव्हा लागू होणार

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या ज्ञापनात असे म्हटले आहे की, ही वाढ 15 जुलै 2021 पासून प्रभावी मानली जाईल. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, ज्यांना पगार दिला जातो, तो मूळ वेतनाच्या 189 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आलाय. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पगारदार कर्मचाऱ्यांचा डीए 356 टक्क्यांवरून आता 368 टक्के करण्यात आलाय. केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आल्याचाही केंद्राच्या मेमोरँडममध्ये उल्लेख आहे.

तीन हप्त्यांमध्ये वाढीव भत्ता जोडला

विशेष म्हणजे मार्च 2020 मध्ये कोरोना आला, तेव्हा सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत गोठविली होती, जी 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पर्यंत ही थकवण्यात आली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत 17 टक्के डीए आणि डीआर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ राज्यमंत्री म्हणाले होते. 1 जुलै 2021 पासून तीन हप्त्यांमध्ये वाढीव भत्ता जोडून हा लाभ देण्यात आला. हेच कारण आहे की, आता महागाई भत्ता आणि मदत एकत्रितपणे 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के झाली. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून 3 टक्के, 1 जुलै 2020 पासून 4 टक्के आणि 1 जानेवारी 2021 पासून 4 टक्के दरवाढ समाविष्ट आहे. अशा प्रकारे एकूण वाढ 11 टक्के वाढ करण्यात आली होती.

एचआरए देखील 27% वाढवला

महागाई भत्त्यासंदर्भातील वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारनेही घरभाडे भत्ता (HRA) मध्ये 27 टक्के वाढ केली. वस्तुतः खर्च विभागाने 7 जुलै 2017 ला एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के ओलांडेल, तेव्हा घरभाडे भत्ता सुधारित केला जाणार आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला, त्यामुळे घरभाडे भत्ताही सुधारित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

युनियन बँक ऑफ इंडियाचा नफा तिप्पट वाढला, उत्पन्नातही फायदा

बँक ऑफ इंडियाचा धमाका, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 100% वाढ, NPA घटला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.