कर्जात बुडालेल्या Vi चे MTNL-BSNL मध्ये विलीनीकरण होणार, सरकारची योजना काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी Vi चे सरकारी संचालित कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचे कोणतेही प्रस्ताव केंद्र सरळ नाकारू शकते. ज्यांचा व्यवसायाचा रेकॉर्ड खराब आहे, त्यांनी आधी कर्जातून बाहेर पडण्याची गरज आहे, असंही सरकारचं म्हणणं असल्याची चर्चा आहे.

कर्जात बुडालेल्या Vi चे MTNL-BSNL मध्ये विलीनीकरण होणार, सरकारची योजना काय?
Vodafone-Idea
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 3:33 PM

नवी दिल्लीः आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या व्होडाफोन आयडियासाठी एक वाईट बातमी आहे. व्होडाफोन आयडियाचे MTNL-BSNLमध्ये विलीनीकरण करण्याच्या विरोधात सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी Vi चे सरकारी संचालित कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचे कोणतेही प्रस्ताव केंद्र सरळ नाकारू शकते. ज्यांचा व्यवसायाचा रेकॉर्ड खराब आहे, त्यांनी आधी कर्जातून बाहेर पडण्याची गरज आहे, असंही सरकारचं म्हणणं असल्याची चर्चा आहे.

आम्ही याला परवानगी कशी देऊ शकतो

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने TOI ला सांगितले की, आम्ही याला परवानगी कशी देऊ शकतो. हे जवळजवळ नफ्याचे खासगीकरण आणि तोट्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यासारखे आहे. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक कायदेशीर समस्यांमुळे VI चे MTNL आणि BSNL मध्ये विलीनीकरण कठीण झालेय.

बिर्ला यांची आपला हिस्सा सरकारला देण्याची ऑफर होती

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) मधील आपला हिस्सा सरकार किंवा अशा कोणत्याही संस्थेला देण्याची ऑफर दिली होती. बिर्ला यांनी 7 जून रोजी हे पत्र लिहिले. ते म्हणाले की, जुलैपर्यंत या तीन मुद्द्यांवर सरकारकडून तत्काळ सक्रिय सहकार्याच्या अनुपस्थितीत, VIL ची आर्थिक स्थिती बुडण्याच्या मार्गावर पोहोचेल, जे हाताळणे कठीण होईल. बिर्ला म्हणाले होते की, VIL शी संबंधित 27 कोटी भारतीयांप्रति आमचे कर्तव्य आहे. हे पाहता मी कंपनीतील माझे भाग सरकारला किंवा अशा कोणत्याही घटकाला सरकारच्या स्वाधीन करण्यास तयार आहे, जे कंपनीचे कामकाज चालू ठेवण्यास सक्षम आहे.

कंपनीवर 1.80 लाख कोटींचे कर्ज

व्होडाफोन आयडियावर सध्या 1.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि मार्च तिमाहीत 7,000 कोटींच्या तोट्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनुसार, त्यांच्यावर 1.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज चुकवण्याची तारीख जवळ येत आहे, तर निधीची उपलब्धता हे एक आव्हान आहे.

अशा प्रकारे एकूण 1.8 लाख कोटी रुपयांची थकबाकी

व्होडाफोन आयडियावर बँकांचे 23,000 कोटी रुपये, 61,000 कोटी रुपयांची AGR थकबाकी आणि 96,3000 कोटी रुपयांची स्पेक्ट्रम पेमेंट थकीत आहे. अशा प्रकारे एकूण 1.8 लाख कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय बँक हमी आणि स्पेक्ट्रम आणि AGR अनेक हजार कोटींची थकबाकी आणि बँक कर्जाचे व्याज भरणे बाकी आहे.

म्हणून बिर्ला यांनी अध्यक्षपद सोडले

कंपनीने सरकारला विनंती केल्यानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि थेट पदाचा राजीनामा दिला. व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाने नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हिमांशू कापनिया यांची नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्ती केली.

संबंधित बातम्या

तुम्ही नोकरी करत असल्यास हा फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांना मुकणार

तुम्ही कर्जाची परतफेड केलीय, मग हा कागद बँकेतून नक्की घ्या, अन्यथा…

Debt-ridden Vi will be merged into MTNL-BSNL, what is the government’s plan?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.