Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

December Bank Holiday List : डिसेंबर 2021 मध्ये 12 दिवस बँका बंद, एका क्लिकवर संपूर्ण यादी

Bank Holiday List : सण आणि ख्रिसमस, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन पुढील महिन्यात रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार वगळता एकूण सात सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. विशेष म्हणजे बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार आणि काही खासगी बँकांमध्ये वेगवेगळ्या असतात.

December Bank Holiday List : डिसेंबर 2021 मध्ये 12 दिवस बँका बंद, एका क्लिकवर संपूर्ण यादी
Bank holiday list
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 4:37 PM

नवी दिल्लीः जर तुम्हीसुद्धा पुढच्या महिन्यात बँकांची कामं उरकण्याचा विचार करत असाल तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासून घ्या. कारण डिसेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2021 साठी शेअर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार डिसेंबरमध्ये सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका 12 दिवसांपर्यंत बंद राहतील.

रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार वगळता एकूण सात सुट्ट्या जाहीर

सण आणि ख्रिसमस, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन पुढील महिन्यात रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार वगळता एकूण सात सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. विशेष म्हणजे बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार आणि काही खासगी बँकांमध्ये वेगवेगळ्या असतात. शिवाय सुट्ट्या तीन टप्प्यांत विभागलेल्या आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट अंतर्गत हॉलिडे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत हॉलिडे आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँकांचे क्लोजिंग अकाऊंटला अशा सुट्ट्या विभागल्या गेल्यात. यंदा नाताळची सुट्टी डिसेंबर महिन्याच्या चौथ्या शनिवारी येत आहे.

डिसेंबरमधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

3 डिसेंबर : सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणानिमित्त गोव्यात बँका बंद 5 डिसेंबर : रविवार 11 डिसेंबर : दुसरा शनिवार 12 डिसेंबर : रविवार 18 डिसेंबर: यू सो सो थामच्या पुण्यतिथीनिमित्त फक्त मेघालयमध्ये बँका बंद राहणार आहेत. 19 डिसेंबर : रविवार 24 डिसेंबर: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 25 डिसेंबर: ख्रिसमस/चौथा शनिवार 26 डिसेंबर : रविवार 27 डिसेंबर: ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद राहतील) 30 डिसेंबर : शिलाँगमध्ये बँका बंद 31 डिसेंबर : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयझॉलमध्ये बँका बंद राहणार आहेत

2022 च्या नव्या वर्षात एवढ्या सुट्ट्या

2021 वर्ष संपायला अद्यापही जवळपास 1 महिना बाकी आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या आगमनाचीही जोरदार तयारी सुरू झालीय. 2022 हे वर्ष सुट्टीच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. शनिवार-रविवार काही हॉलिडे आले नसते तर या सुट्ट्यांचा आकडा आणखी वाढून द्विगुणित झाला असता. पण 2022 मध्ये 18 राजपत्रित सुट्ट्या असतील. याशिवाय विश्रांतीसाठी प्रतिबंधित सुट्ट्या (restricted holiday) असतील. प्रतिबंधित सुट्ट्या म्हणजे त्या सुट्ट्या ज्यामध्ये संस्थेचा मालक किंवा कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय उघडू शकते. परंतु सहसा या दिवशी बहुतेक कार्यालये बंद असतात.

संबंधित बातम्या

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

Public Holidays In 2022 : 2022 च्या नव्या वर्षात इतक्या सुट्ट्या, 12 सुट्ट्यांची मजाच निघून जाणार; पण कशी?

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.