महागाईचा भडका! हिंदुस्थान युनिलिव्हरचा ग्राहकांना धक्का; चहा, कॉफीच्या भावात 14 टक्क्यांची वाढ

हिंदुस्थान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) आपल्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने ब्रू कॉफीचे (Bru coffee) दर तीन ते सात टक्क्यांनी वाढवले आहेत. ब्रू गोल्ड कॉफीच्या प्रती पॅक मागे तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

महागाईचा भडका! हिंदुस्थान युनिलिव्हरचा ग्राहकांना धक्का; चहा, कॉफीच्या भावात 14 टक्क्यांची वाढ
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:47 PM

हिंदुस्थान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) आपल्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. ‘सीएनबीसी’च्या रिपोर्टनुसार कंपनीने ब्रू कॉफीचे (Bru coffee) दर तीन ते सात टक्क्यांनी वाढवले आहेत. ब्रू गोल्ड कॉफीच्या प्रती पॅक मागे तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर ब्रु इन्स्टंट कॉफी पाऊचीच किंमत सहा टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. एवढेच नाही तर कंपनीने चहाच्या (TEA) किमतीमध्ये देखील वाढ केली असून, ताजमहाल चहाच्या किमतीमध्ये 3.7 ते 5.8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर ब्रूक बॉंड टीची किंमत तब्बल 14 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. भाववाढीबद्दल कंपनीकडून खुलासा देखील करण्यात आला आहे. कच्चा माल महाग झाला आहे, तसेच मनुष्यबळ देखील महागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या किमतीमध्ये उत्पादनाची विक्री करणे परवडत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

फेब्रुवारी महिन्यात दोनदा दरवाढ

फेब्रुवारी महिन्यात हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या विविध उत्पादनामध्ये दोनदा दरवाढ केली होती. त्यामध्ये डिटर्जंट पावसडर आणि साबनाचा समावेश होता. या उत्पादनामध्ये 9 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. हिंदुस्थान युनिलिव्हरने फेब्रुवारी महिन्यात लाईफबॉय, लक्स आणि पीयर्स या साबनाचे भाव वाढवले होते. त्यासोबतच कम्फर्ट फॅब्रिक कंडीशनर, डव्ह बॉडी वॉशचे देखील दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता कंपनीने कॉफी आणि चहाच्या किमतीमध्ये वाढ केली आहे.

कच्चा माल महागला

उत्पादनाचे दर वाढवण्यात आले आहेत, याबाबत हिंदुस्थान युनिलिव्हरकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आले आहे. दिवसेंदिवस कच्चा माल महाग होत आहे. मनुष्यबळ देखील महागले आहे. त्यामुळे उत्पादनाचा निर्मिती खर्च वाढला आहे. निर्मिती खर्च वाढल्याने जुन्या दरात कंपनीला वस्तू विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे उत्पादनाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. सोबतच सध्या युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाल्याचे कंपनीने सांगितले.

संबंधित बातम्या

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?

टेलिकॉम क्षेत्राचे रुपडे पलटणार; ‘5G’बाबत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले वैष्णव?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.