Gold rate today : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घट, नवे प्रति तोळा दर किती?

दिल्लीतील सोन्याच्या बाजारात बुधवारी (9 जून) सोन्याचे दर 92 रुपयांनी कमी झाले. यासह प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचे दर 48,424 रुपये इतके झाले आहेत.

Gold rate today : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घट, नवे प्रति तोळा दर किती?
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 2:47 AM

नवी दिल्ली : दिल्लीतील सोन्याच्या बाजारात बुधवारी (9 जून) सोन्याचे दर 92 रुपयांनी कमी झाले. यासह प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचे दर 48,424 रुपये इतके झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीने याबाबत माहिती दिलीय. मागील व्यापारी सत्र 48,516 रुपये प्रति 10 ग्रॅम सोने दरावर बंद झाले होते. याचप्रमाणे चांदीच्या दरातही 414 रुपयांनी घट झालीय. सध्या चांदीचे दर प्रति किलो 70,181 रुपये इतके झालेत. मागील व्यापारी सत्रात चांदीचे दर 70,595 रुपये प्रतिकिलो इतके होते (Decrease in price of Gold and Silver know all about new rate).

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाईटवरील माहितीप्रमाणे, 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर 48981 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 70,819 रुपये प्रति किलोग्रॅ होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल म्हणाले, “डॉलरच्या चढउतारात सोन्याच्या किमतीत एका मर्यादित प्रमाणात घट पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांची नजर सध्या अमेरिकेतील महागाईवरही आहे.” मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे नवनीत दमानी म्हणाले, “सोन्याच्या किमतीत एका विशिष्ट प्रमाणात चढउतार आहेत. यामागे अमेरिकेतील महागाईचे येणारे आकडे आणि युरोपच्या केंद्रीय बँकेच्या धोरणात्मक बैठकीआधी गुंतवणुकदार कोणताही मोठा व्यवहार करण्याबाबत सतर्कता बाळगत आहेत.”

चांदीचे दर काय?

चांदीचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर 27.76 डॉलर प्रति आउंस (28.35 ग्रॅम) इतके आहेत. देशांतर्गत बाजारात MCX वर चांदीच्या डिलिव्हरीत थोडी वाढ आहे. जुलैत डिलिव्हरी करण्यात येणाऱ्या चांदीचे यावेळचे दर 86 रुपयांच्या वाढीसह 71,317 रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत. सप्टेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीचे दर 64 रुपयांनी वाढ 72,495 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत गेले आहेत.

हेही वाचा :

Gold Rate Today | 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले 10 ग्रॅम सोन्याचे दर, जाणून घ्या आजचा नवा भाव

Gold Price Today | चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा नवा दर

Gold Price Today | सोन्याने गाठला 48 हजारांचा टप्पा, सलग तिसऱ्या दिवशीही भाव वाढ, जाणून घ्या नवे दर

व्हिडीओ पाहा :

Decrease in price of Gold and Silver know all about new rate

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.