1 फेब्रुवारीच्या बजेटपूर्वी ‘हे’ 4 डिफेन्स शेअर्स खरेदी करा अन् मालामाल व्हा!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकार संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूदीत वाढ करेल, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. याचा परिणाम संरक्षण क्षेत्रातील शेअर्सवर होणार आहे. यासाठी तुम्ही पुढील 4 शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. जाणून घेऊया.

1 फेब्रुवारीच्या बजेटपूर्वी ‘हे’ 4 डिफेन्स शेअर्स खरेदी करा अन् मालामाल व्हा!
share marketImage Credit source: tv9 bharatvarsh
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 12:41 AM

1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. बाजारात उतरावे की अधिक काळ थाबावे, हे गुंतवणूकदारांना समजत नाही. 13 जानेवारीला शेअर बाजार सुरू झाला तेव्हापासून विक्रीचा दबाव कायम होता. व्यवहाराअंती सेन्सेक्स 1048 अंकांनी घसरून 76,330 च्या पातळीवर बंद झाला. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी बजारात आणखी घसरण होणार का? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे सर्व चढ-उतार असूनही जर तुम्हालाही अर्थसंल्पापूर्वी काही डिफेन्स शेअर्समध्ये पैसे लावायचे असेल तर येथे असे चार शेअर्स आहे, ज्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण, तुम्ही पैसे लावताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पहिली कंपनी- हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

पहिला स्टॉक हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीचा आहे. ही कंपनी विमाने आणि हेलिकॉप्टरची निर्मिती करते. यासोबतच लढाऊ विमानांचे असेंबलिंग आणि देखभालीचे कामही करते. या कंपनीने अशी अनेक विमाने बनवली आहेत, जी पूर्वी केवळ आयात केली जात होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणे देशातच तयार करण्यावर भर देण्यात आला आणि त्याचा फायदा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीला झाला आहे. कंपनीचे ऑर्डर बूक खूप मजबूत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात 27 टक्के परतावा दिला आहे. अर्थसंकल्पात सरकारने संरक्षणासाठी केलेल्या अधिक तरतूदीचा परिणाम या कंपनीच्या शेअर्सवर दिसून येतो. आता गुंतवणूक केल्यास काही आठवड्यांत चांगली कमाई होऊ शकते.

दुसरी कंपनी- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

दुसरी कंपनी म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL). ही कंपनी संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. एकूण महसुलात संरक्षण क्षेत्राचा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आहे. सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षणासाठी तरतूद वाढवण्याचा थेट फायदा या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कंपनीच्या शेअर्सवर होणार आहे. गेल्या वर्षभरात या शेअर्सने सुमारे 40 टक्के परतावा दिला आहे. मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, कंपनीचे ऑर्डर बुक आणि मजबूत फंडामेंटल पाहता 2025 मध्येही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, कंपनीला संरक्षणासाठीच्या वाटपाचा थेट लाभ 1 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे.

तिसरी कंपनी- भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL)

तिसरा शेअर भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) कंपनीचा आहे. ही कंपनी लष्करासाठी गाईडेड क्षेपणास्त्रे आणि संरक्षण उपकरणे तयार करते. सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा या कंपनीला फायदा झाला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचे ऑर्डर बुक 194 अब्ज रुपये होते. कंपनी निर्यातीवरही भर देत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये संरक्षणाच्या वाटपात सरकारने केलेल्या वाढीचा परिणाम त्याच्या शेअर्सवर होणार आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात जवळपास 27 टक्के परतावा दिला आहे.

चौथी कंपनी- माझगांव डॉक शिपबिल्डर्स

अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करण्याजोगा चौथा शेअर म्हणजे माझगांव डॉक शिपबिल्डर्स (MDL) ही कंपनी सीप्लेन तयार करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. यात युद्धनौका, पाणबुड्या आणि ऑफशोर प्लॅटफॉर्मसह अनेक गोष्टींची निर्मिती केली जाते. संरक्षणाशी संबंधित उत्पादनांचा महसुलात सुमारे 98 टक्के वाटा आहे. कंपनी व्यावयासिक जहाज दुरुस्तीच्या संधींचा ही शोध घेत आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने 80 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी तरतूरद वाढवण्याचा फायदाही या कंपनीला मिळणार आहे. आपल्याकडे आता संरक्षण क्षेत्रातील 4 शेअर्स आहेत.

या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.

शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.