AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ते पे सत्ता! नोटबंदीला सात वर्षे पूर्ण, काय झाला बदल

Demonetization | वर्ष 2016 मध्ये नोटबंदी झाली. पण तेव्हापासून अजूनही त्याविषयीच्या चर्चांना काही विराम मिळाला नाही. या नोटबंदीतून केंद्र सरकारचे सर्वच दावे धुवून निघाले, असा आरोप विरोधकांनी केला. तर देशाच्या प्रगतीसाठी, भ्रष्टाचाराला, दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी ही नोटबंदी मोलाची ठरल्याचा दावा केंद्राने केला आहे. असा झाला नोटबंदीचा सात वर्षांचा प्रवास..

सत्ते पे सत्ता! नोटबंदीला सात वर्षे पूर्ण, काय झाला बदल
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस देशाच्या इतिहासात अभूतपूर्व ठरला. रात्री 8 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवर रात्री 12 वाजेपासून नोटबंदीची घोषणा केली. त्यात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याचे जाहीर करण्यात आले. नोटबंदीच्या घोषणेने सर्वसामान्यच नाही तर व्यापारी, उद्योजक या सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर या इतिहासाचा सर्वच पिढ्या साक्षीदार ठरल्या. देशातील नागरिक बँकांच्या बाहेर रांगेत ताटकाळत उभा ठाकला. त्याला नोटा बदलण्यासाठी कामधंदा सोडून अनेक तास उभं राहावे लागले. पुढे कित्येक महिने देशातच नाही तर परदेशात पण त्यावर खमंग चर्चा रंगल्या. अजूनही नोटबंदीवर वाद प्रतिवाद सुरुच आहे.

2000 हजारांची नोट बाजारात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात उतरवल्या. त्यांना ‘महात्मा गांधी न्यू सीरीज ऑफ नोट्स’ असे नाव देण्यात आले. दोन हजारांच्या गुलाबी नोट चर्चेत आली. त्याचा प्रिटिंग खर्चापासून दर्जापर्यंत चर्चा रंगली. या नोटा चलनात आल्याने व्यवहार सोपे होण्याचा केंद्राचा दावा होता.

हे सुद्धा वाचा

नोटबंदीसाठी ही दिली कारणे

  • देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदी
  • काळे धन आणि त्याचा वापर करणाऱ्यांना नोटबंदी ही चपराक
  • दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी नोटबंदी हे एक शस्त्र
  • बोगस नोटांना प्रतिबंध करण्यासाठी ही नोटबंदी
  • अनेक जणांनाकडे नोटांची साठेबाजी, त्यासाठी नोटबंदी

गुलाबी नोट पण चलनाबाहेर

दोन हजारांची नोट बाजारात उतरल्यानंतर त्यासाठी एटीएममध्ये बदल करण्यात आले. त्यावर मोठा खर्च झाला. त्यानंतर या नोटांची पण साठेबाजी होत असल्याची कुणकुण केंद्र सरकारला लागली. या नोटा चलनातून बाहेर करण्यासाठी या वर्षी मे महिन्यात मुहूर्त काढण्यात आला. 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत गुलाबी नोटा बदलण्याची कवायत देशभरात झाली. पण यावेळी जनतेला त्रास झाला नाही. कारण गुलाबी नोटा अगोदरच चलनातून कमी झाल्या होत्या. 30 सप्टेंबर रोजी ही डेडलाईन 7 ऑक्टोबर 2023 रोजीपर्यंत वाढविण्यात आली. आता या नोटा रिझर्व्ह बँकेच्या 19 विभागीय कार्यालयात बदलण्याची सुविधा आहे. तर पोस्टाने सविस्तर माहिती पाठवून तुम्ही या नोटा बदलवू शकता.

100 नागरिकांचा मृत्यू

नोटबंदीच्या एका निर्णयाने त्यावेळी देशातील 86 टक्के नोटा एका झटक्यात चलनाबाहेर झाल्या. जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरात बँकांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. नोटा बदलण्यासाठी काही जणांनी कमिशन मिळवले. त्यानंतर नियमांत सूसुत्रता आणण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यावेळी या सर्व कवायतीत रांगेत उभा असलेल्या काही लोकांना त्रास असह्य झाला. त्यात 100 लोकांचा मृत्यू ओढावला. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत नोटबंदी काळात 4 लोकांचा मृत्यू झाला. त्यात एक ग्राहक आणि 3 बँक कर्मचारी होते. त्यांच्या कुटुंबियांना 44,06869 रुपयांची भरपाई दिल्याची माहिती दिली. अर्थात जनता सरकारच्या पाठिशी असल्याचे दिसून आले.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....