Alert ! 5 दिवसांत ‘हे’ काम करुन घ्या, अन्यथा 5 हजार रुपये दंड भरावा लागणार
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) यांची मुदत संपली असेल तर लवकरात लवकर त्यांचे नुतनीकरण कुरुन घ्या
मुंबई : वाहन चालवण्यासाठी सरकारच्या नियमानुसार तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) तसेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) असणे बंधनकारक आहे. ते नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) यांची मुदत संपली असेल तर लवकरात लवकर त्यांचे नुतनीकरण कुरुन घ्या. कारण 31 डिसेंबरपर्यंत नुतनीकरण केले नाही, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. नव्या मोटार व्हेईकल अॅक्टनुसार हा दंड 5000 रुपये आहे. (detail information of driving license and registration certificate updation of vehicle)
शेवटची मुदत 31 डिसेंबर 2020
कोरोना महामारीमुळे सराकारने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) यांच्यासोबतच पोल्यूशन सर्टिफिकेटसारख्या परवान्यांची वैधता 31 दिसंबर 2020 पर्यंत वाढवली होती. या मुदतीअंतर्गत 1 फेब्रुवारी 2020 पर्यंतची वैधता असलेले किंवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत असलेले सर्व कागदपत्र 31 डिसेंबरनंतर अवैध असतील. मात्र, ही मुदत आता पाच दिवसांत संपत आहे. त्यामुळे वाहनासंबंधीचे कागदपत्रे या पाच दिवसांत अपडेट करता येतील. 31 डिसेंबरनंतर कागदपत्रांची वैधता संपलेले वाहन चालवताना आढळल्यास नियमाप्रमाणे 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. कोरोना महामारीमुळे 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत किंवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैधता असलेले सर्व कागदपत्र 31 डिसेंबरनंतर अवैध असतील.
5000 दंड भरावा लागणार
नव्या मोटार वाहन अधिनियमानुसार मुदत संपलेले ड्रायव्हिंग लायसन्स आढळल्यास 5000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) नसताना गाडी चालवल्यावरदेखील 5000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आरसी असे अपडेट करा
>> सर्वात आधी parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगईन करा
>> त्यानंतर ‘DL services’ या ऑप्शनवर क्लिक करा. त्यांनतर DL नंबर टाईप करा
>> विचारलेली संपूर्ण माहिती भरा, तसेच विचारलेले सर्व कागदपत्रं ऑनलाईन अपलोड करा
>> आवश्यक असेलेली प्रोसेसिंग फी भरा
>> या प्रक्रियेनंतर RTO कार्यालयात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल.
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या नुतनीकरणाची प्रक्रिया ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी करायवयाच्या प्रक्रियेसारखीच आहे.
पाच घटनांनी महाराष्ट्र हादरला, कुठे हत्या, कुठे आत्महत्या, बघा तुमच्या शहरात काय घडतंय?https://t.co/InBkSYNt2E
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020
संबंधित बातम्या :
नव्या वर्षात सोने खरेदीचा बेत आखताय? मग ही स्वस्त मस्त योजना वाचा
Anil Ambani | अनिल अंबानींना मोठा झटका, RCOMचे 3 बँक खाते फ्रॉड!
1 जानेवारीपासून GST चा नियम बदलणार, 45000 व्यापाऱ्यांवर होणार परिणाम
(detail information of driving license and registration certificate updation of vehicle)