आता ‘या’ कंपनीचे शेअर्स बाजारात राहणार नाही, ईशा अंबानीच्या सासऱ्यांकडून खरेदी
एकेकाळी दबदबा असलेल्या दीवान हाउसिंग फायनेंस कॉरपोरेशनचे (DHFL) शेअर्स आता यापुढे बाजारात नसणार आहेत.
नवी दिल्ली : शेअर बाजार म्हणजे अनेक शक्यतांचं ठिकाण. इथं आज काय परिस्थिती आहे आणि उद्या काय असेल याचा चांगल्या चांगल्या अनुभवी लोकांनाही अंदाज येत नाही. आता अशीच काहीशी घटना घडत आहे. एकेकाळी दबदबा असलेल्या दीवान हाउसिंग फायनेंस कॉरपोरेशनचे (DHFL) शेअर्स आता यापुढे बाजारात नसणार आहेत. बीएसई (BSE) आणि एनएसईने (NSE) याबाबत एक परिपत्रक काढून गुंतवणूकदारांना याबाबत माहिती दिलीय. त्यामुळे या कंपनीचा व्यवसाय आता बंद झाल्यात जमा आहे. हे असं होण्यामागे मोठं कारण आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानीच्या सासऱ्यांनी (Piramal Group) ही कंपनी खरेदी केलीय (DHFL shares exchanges suspended for trading from 15 June 2021).
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) DHFL कंपनीला दिवाळखोर म्हणून जाहीर केलं होतं. यानंतर पिरामल समुहाने इनसॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत ही कंपनी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. याला भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली. त्यानंतर आता न्यायाधीकरणाने देखील अंतिम मंजुरी दिल्यानं या कंपनीचं शेअर बाजारातील अस्तित्व संपलं आहे. न्यायाधिकरणाने 7 जून रोजी इनसॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत उपाययोजनांनुसार हा निर्णय घेतला.
14 जूनपासून DHFL चा शेअर बाजारातील व्यवसाय बंद
बीएसई आणि एनएसईने शुक्रवारी (11 जून) वेगवेगळी परिपत्रकं काढू 14 जून रोजी डीएचएफएलच्या शेअर्सचे व्यवहार बंद करण्याची माहिती दिली.
34250 कोटी रुपयांना DHFL कंपनीचा व्यवहार
पिरामल ग्रुपने DHFL कंपनीसाठी 34 हजार 250 कोटी रुपयांची बोली लावली. त्याला आरबीआयने आधीच मंजूरी दिली होती. आता NCLT नेही मंजुरी दिली. DHFL वर विविध बँकांचे 90,000 कोटी रुपये कर्ज आहे. डीएचएफएल बँक, म्यूचुअल फंड आणि कंपनीकडे फिक्स्ड डिपॉजिट करणाऱ्या गुंतवणुकदारांचे मिळून 90,000 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. म्हणूनच ही कंपनी दिवाळखोरीत निघाली.
हेही वाचा :
3 वर्षात तब्बल 9600 टक्क्यांचा बंपर फायदा देणारी रामदेव बाबांची कंपनी, पुन्हा एकदा गुंतवणुकीची संधी
मोदी सरकारचा निर्णय पथ्यावर पडला; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार एका महिन्यात मालामाल
‘या” शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, दर 25 रुपयांपेक्षाही कमी
व्हिडीओ पाहा :
DHFL shares exchanges suspended for trading from 15 June 2021