Dhirubhai Ambani : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! धीरुभाई अंबानी यांनी मन जिंकल राव, काय आहे तो पार्टीचा किस्सा

Dhirubhai Ambani : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो मंडळी, धीरुभाई अंबानी म्हणजे अब्जाधीश, मोठी हस्ती, पण त्यांच्या मनाच्या ओलाव्याची खास झलक वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी नुकतीच उलगडली...

Dhirubhai Ambani : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! धीरुभाई अंबानी यांनी मन जिंकल राव, काय आहे तो पार्टीचा किस्सा
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 8:14 PM

नवी दिल्ली : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो मंडळी, धीरुभाई अंबानी म्हणजे अब्जाधीश, मोठी हस्ती, पण त्यांच्या मनाच्या ओलाव्याची खास झलक वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी नुकतीच उलगडली. वेदांता समुहाचे मालक अनिल अग्रवाल (Vedanta Anil Agarwal) हे भारतातील अब्जाधीश उद्योगपतींपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावर पण सक्रीय असतात. त्यांनी व्यावसायिक आयुष्यातील संघर्षाचा पटल सर्वांसमोर उलगडला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करुन भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या दर्यादिलीचा हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे.

धीरभाईंच्या भेटीसाठी आटापिटा तर अनिल अग्रवाल बिहारमधून 1977 आणि 1978 च्या दरम्यान मुंबईत दाखल झाले. त्यांनी यशस्वी उद्योजक कोण आहेत, याचा कानोसा घेतला. त्यावेळी सर्वांच्या मुखी केवळ धीरुभाई अंबानी यांचे नाव होते. त्यांना धीरुभाईंची भेट घ्यायची होती. पण भेट होत नव्हती. ते ओबेरॉय हेल्थ क्लबमध्ये नित्यनियमाने येतात, अशी पक्की बातमी अनिल अग्रवला यांना लागली.

अशी झाली ओळख ओबेरॉय हेल्थ क्लबमध्ये धीरुभाई यांची भेट घेण्यासाठी अनिल अग्रवाल गेले. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यावर धीरुभाईंनी त्यांना एका कोपऱ्यात बसवले. थोड्यावेळाने ते अनिल अग्रवाल यांना भेटले. त्यावेळी अग्रवाल यांनी त्यांना खास बिहारी जोक ऐकवला. त्यावर ते हसले आणि दुसऱ्या दिवशी क्लबमध्येच भेटण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

पार्टीमागचे कारण काय अनिल अग्रवाल यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. सिंडिकेट बँकेच्या चेअरमनसोबत त्यांची चर्चा सुरु होती. त्यांनी चेअरमनला पार्टीसाठी येण्याचे आमंत्रण दिले. पण चेअरमन काही राजी होईना. त्यामुळे अनिल अग्रवाल यांनी, धीरुभाई पार्टीला येणार असल्याचे चेअरमनला सांगितला. त्यानंतर चेअरमन लागलीच तयार झाला.

धीरुभाईंना सांगून टाकले खरे त्यानंतर अनिल अग्रवाल यांनी दुसऱ्या दिवशी क्लबमध्ये जाऊन धीरुभाईंची भेट घेतली. त्यांना चेअरमनसोबतचा किस्सा सांगितला. तसेच त्यांची परवानगी न घेता पार्टीला येत असल्याची मारलेली थाप पण सांगितली. त्यावर धीरुभाई हसले. पण पार्टीला येणार की नाही, हे त्यांनी गुलदस्त्याच ठेवले. त्यामुळे अनिल अग्रवाल यांचा जीव टांगणीला लागला.

अन् धीरुभाईंनी मन जिंकलं धीरुभाई बरोबर वेळेवर पार्टीत पोहचले. ते फार काळ थांबले नाही. सर्वांना आणि चेअरमनला भेटून बाहेर पडले. पार्टी संपल्यावर अनिल अग्रवाल पार्टीचे बिल देण्यासाठी गेले तर बिल अगोदरच जमा झाल्याचे मॅनेजरने सांगितले. धीरुभाई अंबानी यांनी अग्रवाल यांच्या पार्टीचे बिल चुकते केले होते. धीरुभाईंमुळेच अग्रवाल यांना सिंडिकेट बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज मिळाले. अग्रवाल यांच्या व्यवसायाची सुरुवात याच पैशातून झाली. जी माणसं लोकप्रिय आणि चर्चितील असतात, त्यांच्या काही ना काही वैशिष्ट्ये जरुर असतात, असा अनुभव अग्रवाल यांनी सांगितला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.