विना इंटरनेट साध्या मोबाईल फोनवरुनही Digital Payment होणार, जाणून घ्या कसे?

आता डिजीटल पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोनचीही गरज राहिली नसून इंटरनेट नसलेल्या साध्या मोबाईलवरुनही असे व्यवहार करता येणार आहेत.

विना इंटरनेट साध्या मोबाईल फोनवरुनही Digital Payment होणार, जाणून घ्या कसे?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 2:16 AM

मुंबई : सध्याचं युग ऑनलाईनचं आहे. खाण्या-पिण्यापासून ते अगदी शॉपिंगपर्यंत आणि फिरण्यापासून मौजमजा करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंटमुळे गोष्टी सहजसोप्या झाल्यात. त्यामुळे सोबत रोख पैसे असोत अथवा नसो काहीही फरक पडत नाही. पेटीएम आणि गुगल पे सर्वच यूपीआय सेवा देणाऱ्या डिजीटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध करुन देतात. त्यामुळे कॅब बुक करणं असो, जेवणाचं बिल देणं असो किंवा मग रेल्वे अथवा विमानाचं तिकिट बूक करणं असो सर्वकाही आपल्या स्मार्टफोनवर शक्य होतं. पण आता हे सर्व करण्यासाठी स्मार्टफोनचीही गरज राहिली नसून इंटरनेट नसलेल्या साध्या मोबाईलवरुनही असे व्यवहार करता येणार आहेत (Digital payment without internet to be possible by non smart phones).

सर्वसामान्य नागरिकांकडे स्मार्टफोन नसल्यास अशा ग्राहकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अशा ग्राहकांची संख्या देशात मोठी आहे. हेच ओळखून भारतात आता फीचर फोन वापरणाऱ्यांना आपल्या साध्या फोनमधून डिजीटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

RBI कडून Eroute Technologies ला परवानगी

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)आपल्या रेग्युलेटरी सँडबॉक्स इनिशिएटिव्ह अंतर्गत पहिल्या टप्प्यात Eroute Technologies Private Ltd च्या रिटेल सेवेच्या चाचणीसाठी परवानगी दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास नॉन-स्मार्ट किंवा फीचर फोनचा उपयोग करुन देखील डिजीटल व्यवहार करणं शक्य होणार आहे.

आतापर्यंत डिजीटल पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन आवश्यक मानला जात होता. मात्र, Eroute Technologies च्या यशस्वी चाचपणीनंतर साध्या फोनमधूनही हे डिजीटल व्यवहार करणं शक्य होणार आहे.

हेही वाचा :

Fact Check: आता डिजिटल पेमेंट अ‍ॅपच्या वापरासाठी पैसे मोजावे लागणार?

बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?

डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, ऑनलाईन व्यवहारांना एटीएम पिन नाही

Digital payment without internet to be possible by non smart phones

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.