Digital Currency :उद्यापासून डिजिटल रुपयातून करा व्यवहार, असा करा वापर, इथे करता येणार खरेदी..

Digital Currency : युपीआयमध्ये विक्रम केल्यानंतर भारतात उद्यापासून डिजिटल करन्सीचे युग सुरु होत आहे.

Digital Currency :उद्यापासून डिजिटल रुपयातून करा व्यवहार, असा करा वापर, इथे करता येणार खरेदी..
डिजिटल करन्सीचा श्रीगणेशाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 10:28 PM

नवी दिल्ली : उद्यापासून, 1 डिसेंबर 2022 पासून देशातील व्यवहारात डिजिटल चलनाचा (Digital Currency) पाया रचला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सर्वसामान्यांसाठी डिजिटल रुपया सुरु करत आहे. त्यामुळे आता नागरिकांना खिशात रोख रक्कम ठेवण्याची गरज राहणार नाही. सध्याच्या नोटांसारखाचा त्याचा वापर करता येणार आहे. E-Rupee एक डिजिटल टोकन सारखाच वापर करता येईल. तर प्रश्न असा आहे की, त्याचा वापर कसा करता येईल?

RBI डिजिटल रुपया देशातील काही ठिकाणी सुरु करण्यात येत आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी याच्या सार्वजनिक उपयोगीसाठी पायलट प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा वापर आता गुरुवारपासून देशातील काही ठिकाणी सुरु होत आहे.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वास्तविक ब्लॉकचेन सहित अन्य तंत्रज्ञानावर (Blockchain Technology) आधारीत चलन आहे. होलसेल डिजिटल चलनाचा वापर काही संस्थांना करता येईल. तर किरकोळ चलनाचा वापर सर्वसामान्य नागरिकांना करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय करन्सीचे डिजिटल रुप E-Rupee ला बँकांच्या माध्यमातून वितरीत करता येईल. वापरकर्त्यांना बँकांकडून डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ई-चलनाचा वापर करता येईल. तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून या चलनाचा वापर करता येईल. खरेदी विक्री करता येईल.

डिजिटल रुपया उद्यापासून मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु आणि भुवनेश्वर येथे सुरु होईल. SBI, ICICI Bank, Yes Bank आणि IDFC First Bank या बँका डिजिटल रुपयाच्या प्रकल्पात सहभागी होतील. या डिजिटल रुपयाला आरबीआय नियंत्रीत करेल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही दुकानातून किराणा, दाळी, दूध वा इतर वस्तू खरेदी करता येईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.