Gautam Adani Net Worth : पुन्हा हनुमान उडी! श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचे कमबॅक

Gautam Adani Net Worth : एका महिन्यानंतर गौतम अदानी यांना आनंद वार्ता मिळाली आहे. हिंडनबर्ग वादळानंतर त्यांच्या एकूण संपत्तीत जवळपास 80 अब्ज डॉलरची घट झाली होती. ते श्रीमंतांच्या Top-30 मधून बाहेर फेकले गेले होते. पण आता निराशेचे मळभ हटले आहे.

Gautam Adani Net Worth : पुन्हा हनुमान उडी! श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचे कमबॅक
आनंदवार्ता
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 5:56 PM

नवी दिल्ली : गेल्या एका महिन्यापासून गौतम अदानी (Gautam Adani) आणि अदानी समूहावर (Adani Group) संकटांची मालिका सुरु आहे. हिंडनबर्ग अहवालाने त्सुनामी आणली. 24 जानेवारी 2023 रोजी हा अहवाल सार्वजनिक झाला आणि अदानी समूहाला जोरदार तडाखा बसला. अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर (share) धडाधड कोसळले. परदेशी आणि स्थानिक गुंतवणूकदारांनी विक्री सत्र आरंभले. त्यामुळे सर्वच शेअर कोसळले. या शेअरमध्ये 90 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. पण आता या पडझडीत एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अदानी समूहाच्या काही शेअरमध्ये पुन्हा तेजीचे सत्र आले आहे. गेल्या 24 तासात अदानी यांच्या एकूण संपत्तीत (Net Worth) 2.19 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अब्जाधीशांच्या यादीत आता त्यांचा क्रमांक वधारुन ते Top-30 मध्ये पोहचले आहेत.

अमेरिकन संशोधन संस्था आणि शॉर्ट सेलर हिंडनबर्गने 24 जानेवारी रोजी अहवाल जाहीर केला. त्यात अदानी समूहावर अनियमितता आणि अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर अदानी यांचे वाईट दिवस सुरु झाले. एकाच महिन्यांत त्यांच्या संपत्तीत 80 अब्ज डॉलरपेक्षा ही अधिकची घसरण झाली. पण एका महिन्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कंपन्यांच्या शेअरने पुन्हा कमबॅक केले. त्यात बुधवारीही तेजीचे सत्र सुरु होते.

हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहात भयकंप आला. त्याचा फटका शेअर बाजारालाही बसला. काही महिन्यांपूर्वी गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले होते. त्यांचे स्थान झरझर घसरले. ते टॉप-10, टॉप-20 आणि पुढे टॉप-30 यादीतूनही बाहेर फेकले गेले. यावरुन या अहवालाचा किती तगडा परिणाम झाला हे दिसून येते. पण दोन दिवसांच्या कामगिरीनंतर आता ते पुन्हा अब्जाधीशांच्या टॉप-30 यादीत आले आहेत.

हे सुद्धा वाचा

Hindenburg च्या दणक्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये त्सुनामी आली होती. प्रत्येक दिवशी त्यांना जवळपास 3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. शेअर धडाधड कोसळल्याने अदानी समूहाचे बाजार भांडवल 100 अब्ज डॉलरपेक्षाही कमी झाले. याचा विपरीत परिणाम दिसून आला. डीबी पावर, पीटीसी इंडिया आणि ओरियंट सिमेंटसोबतची डील फिस्कटली. अदानी समूहावर यापेक्षा मोठी नामुष्की ओढावली. त्यांना 20,000 कोटींचा फॉलो ऑन पब्लिक ऑफर रद्द करावी लागली.

बुधवारी शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्सनी जोरदार घौडदौड केली. दुपारी 12.40 वाजेपर्यंत पाच शेअरमध्ये अप्पर सर्किट लागलेले होते. यामध्ये अदानी पावर, अदानी ग्रीन, अदानी बिल्मर, अदानी ट्रासमिशन आणि एनडीटीव्हीच्या शेअरचा समावेश आहे. तर अदानी एटंरप्राईजेसमध्ये 11.73%. अदानी पोर्ट्समध्ये 1.42%, अदानी टोटल गॅसमध्ये 3.37%, अम्बुजा सिमेंटमध्ये 2.02% आणि एसीसी कंपनीच्या स्टॉकमध्ये 1% ची तेजी आली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.