पायलट भरतीवरुन एअर इंडीया आणि आकासामध्ये जुंपली, चांगल्या पायलटची भेडसावतेय टंचाई !

एअर इंडीया एक्सप्रेस आणि आकासा एअर लाईन या दोन कंपन्यात पायलट भरतीवरुन खडाजंगी सुरु झाली आहे. प्रकरण कोर्टात जाण्याच्या बेतात आहे, पाहा काय भानगड झाली आहे.

पायलट भरतीवरुन एअर इंडीया आणि आकासामध्ये जुंपली, चांगल्या पायलटची भेडसावतेय टंचाई !
pilot Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 5:59 PM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : देशात पायलटची टंचाई जाणवू लागली आहे की काय ? कारण देशातील दोन मोठ्या एअरलाईन कंपन्यांनी पायलटच्या बेकायदेशी खरेदीवरुन एकमेकांवर आरोप केले आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानूसार आकासा एअरने सहा महिन्यांचा नोटीसकाळ पूर्ण न करता त्यांच्याकडून एअर इंडीयात रुजू झालेल्या पायलटना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. अशा एकूण 19 पायलटना नोटीस पाठविण्यात आली आहे. तर दुसरीकडे एअर इंडीया एक्सप्रेसने आकासाच्या आरोपाचे खंडन केले आहे. एअर इंडीयाने म्हटले आहे की आकासाने पायलटकडून 50 लाखापर्यंतची रक्कम बॉंड म्हणून घेतली होती. त्यानंतर हे पायलट आपल्या प्रशिक्षणाला आलेला खर्च वसुल करण्यासाठी एअर इंडीयात जॉईंट झाल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात विमान वाहतूक नियंत्रण संस्था नागरी हवाई उड्डाण महा संचालनालयाकडून ( डीजीसीए ) कोणतीही मदत न मिळाल्या एअर इंडीया एक्सप्रेस आणि आकासा दोन्ही कंपन्या एकमेकांच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी करीत आहेत. आकासा एअरचे प्रतिनिधीत्व नोरा चेंबर्स करीत आहे. तर एअर इंडीया एक्सप्रेसने पायलटांच्या बाजूने न्यायलयात प्रतिनिधीत्व करण्यासाठी इंडस लॉ कंपनीला नियुक्त केले आहे.

एअरलाईन कंपन्यांची अडचण

मे महिन्यानंतर आकासा एअरच्या 19 पायलटनी एअर इंडीया एक्सप्रेसमध्ये जॉइंट होण्यासाठी आकासा एअरचा राजीनामा दिला आहे. त्यातील काहींनी तर एक आठवड्यापेक्षाही कमी काळाची नोटीस दिली आहे. ज्यामुळे आकासा एअरला अनेक उड्डाणे रद्द तर काही रिशेड्युल करावी लागली. पायलटना सांभाळुन ठेवण्यासाठी गेल्या दोन महिन्यात एअरलाईन कंपन्यांना मजबूरीने दोन वेळा पगार वाढीला मंजूरी द्यावी लागली आहे.

कंपन्यांचा इतिहास

एअर इंडीया एक्सप्रेस टाटा समूहाने नुकतिच ताब्यात घेतल्या एअर इंडीया लिमिटेडची सहायक कंपनी असून ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बजेट एअरलाईंन्स आहे. एप्रिल 2005 रोजी सुरु झालेल्या एअर इंडीया एक्सप्रेस हीचे मुख्यालय दक्षिणेतील केरळ राज्यात आहे. आकासा एअरला शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी सुरु केले आहे. गेल्यावर्षी त्यांचा मृत्यू झाला. विनय दुबे आकासाचे सीईओ आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.