दिवाळीनिमित्त PNBच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कर्जावरील व्याजदर 6.50% पर्यंत कमी
अलीकडेच PNB ने चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 78 टक्क्यांनी वाढून 1,105 कोटी रुपयांवर पोहोचला. बँकेने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत सांगितले होते की, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 620.81 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
नवी दिल्ली : तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेचे म्हणजेच PNB चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर पीएनबीने बुधवारी कर्जावरील व्याज 0.05 टक्क्यांनी कमी करून 6.50 टक्के केले. पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 8 नोव्हेंबरपासून रेपो अर्थात RLLR (रेपो लिंक्ड लेंडिंग रेट) शी जोडलेले व्याजदर 6.55 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आलेत. RLLR मध्ये कपात केल्याने घर, कार, शिक्षण, वैयक्तिक कर्ज यासह सर्व कर्ज स्वस्त होतील.
17 सप्टेंबरला रेपो आधारित व्याजदर कमी केले
बँकेने शेवटचे 17 सप्टेंबरला रेपो आधारित व्याज 6.80 टक्क्यांवरून 6.55 टक्के केले होते.
PNB Q2 Results: PNB चा नफा 78 टक्क्यांनी वाढून 1,105 कोटी झाला
अलीकडेच PNB ने चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 78 टक्क्यांनी वाढून 1,105 कोटी रुपयांवर पोहोचला. बँकेने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत सांगितले होते की, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 620.81 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी बँकेचे एकूण उत्पन्न सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 21,262.32 कोटी रुपयांवर घसरले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 23,279.79 कोटी रुपये होते. जुलै-सप्टेंबर 2021 या कालावधीत बँकेचा ऑपरेटिंग नफाही 4,021.12 कोटी रुपयांवर घसरला, जो मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 5,674.91 कोटी रुपये होता. अहवालाच्या तिमाहीत PNB बँकेच्या NPA मध्ये किरकोळ वाढ होऊन ते 13.63 टक्क्यांवर पोहोचले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 13.43 टक्के होता. संबंधित बातम्या
क्रेडिट कार्डाने खरेदी करताय; व्याजासह दंड टाळायचा असल्यास ‘हे’ 4 सोपे पर्याय स्वीकारा
7th Pay Commission: ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, डीए वाढल्याने आता एवढे पैसे मिळणार
Diwali gift for PNB customers Loan interest rate reduced to 6.50%