HSBC कडून दिवाळी गिफ्ट! गृहकर्जाचे व्याजदर कमी, जाणून घ्या EMI किती?

सप्टेंबर 2021 मध्ये अनेक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी गृह आणि कार कर्जावरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली होती. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांचा समावेश आहे.

HSBC कडून दिवाळी गिफ्ट! गृहकर्जाचे व्याजदर कमी, जाणून घ्या EMI किती?
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 10:08 PM

मुंबई : खासगी क्षेत्रातील एचएसबीसी बँकेने शुक्रवारी गृहकर्जावरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी करून 6.45 टक्के केला. ही ऑफर गृहकर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यासाठी आहे. या बँकेचा उद्योगातील सर्वात कमी व्याजदर आहे. तसेच नवीन कर्जासाठी एचएसबीसी बँक 6.70 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. हा दर सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने देऊ केलेल्या व्याजदराच्या बरोबरीचा आहे. येस बँकेने गृहकर्जावरील दरही त्याच पातळीवर कमी केलेत. गेल्या महिन्यात कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 6.50 टक्क्यांपासून कमी करण्याची घोषणा केली होती.

गृह कर्जाची मुदत वाढवून 35 वर्षे

येस बँकेने गृह कर्जाची मुदत 35 वर्षे केली. साधारणपणे गृहकर्जाचा कालावधी 30 वर्षे ठेवला जातो. येस बँकेने म्हटले आहे की, पगारदार ग्राहक कमीतकमी कागदपत्रासह परवडणाऱ्या मासिक हप्त्यांमध्ये 35 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेऊ शकतात. ही ऑफर मालमत्ता खरेदी आणि इतर कर्जदारांकडून गृहकर्जाच्या शिल्लक हस्तांतरणावर देखील लागू आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, बँक सध्या 8.95 ते 11.80 टक्के दराने गृहकर्ज देते. अशा परिस्थितीत सध्याच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना सुमारे 2.25 टक्के कमी व्याजदराने गृहकर्ज मिळेल.

SBI आणि PNB ने देखील ऑफर दिल्या

सप्टेंबर 2021 मध्ये अनेक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी गृह आणि कार कर्जावरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली होती. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांचा समावेश आहे. असे मानले जाते की, सणासुदीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्र पुन्हा परत येईल आणि घरांच्या विक्रीत वाढ नोंदवली जाईल. हे लक्षात घेता, बहुतेक बँका अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर देत आहेत.

Yes Bank चा ‘फेस्टिव्ह’ धमाका

या सणासुदीच्या हंगामात येस बँकेने होम लोनवर दमदार ऑफर जारी केलीय. बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 टक्क्यांची मोठी कपात जाहीर केलीय. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि या काळात गृहकर्ज 6.7 टक्के दराने उपलब्ध केले जात आहे. जर पगारदार स्त्रीने कर्ज घेतले, तर तिच्यासाठी व्याजदर 6.65 टक्क्यांपासून सुरू होईल. येस बँकेची ही फेस्टिव्ह ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. व्याजात मोठ्या प्रमाणात कपातीच्या मदतीने बँकेने या तिमाहीत होम लोन बुक दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले. या ऑफर अंतर्गत तुम्ही 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गृहकर्ज घेऊ शकता. प्रीपेमेंट शुल्कदेखील माफ केले गेले आहे. जर तुमचे कर्ज आधीच चालू आहे, तर ते शिल्लक हस्तांतरण करून देखील मिळू शकते.

संबंधित बातम्या

सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही: पीयूष गोयल

Yes Bank चा ‘फेस्टिव्ह’ धमाका, गृह कर्जावरील व्याजदरात 2.25% च्या कपातीची घोषणा

Diwali Gift from HSBC! Low interest rate on home loan, find out what is EMI?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.