Income Tax Rules | मुलांच्या नावे भविष्यकालीन गुंतवणूक, कर सवलत मिळणार का? नियम काय?

जर तुम्हीही मुलांच्या नावावर गुंतवणूक केली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला ही माहिती असणे गरजेचे आहे.(Do minors have to file Income Tax Returns Know the details)

Income Tax Rules | मुलांच्या नावे भविष्यकालीन गुंतवणूक, कर सवलत मिळणार का? नियम काय?
Investment-for-Children
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 8:40 AM

Investment For Minors मुंबई : लहान मुलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी समोर येतात ते भविष्यकालीन खर्च. प्रत्येक घरात लहान मुलांच्या शिक्षणाची, विशेषत: उच्च शिक्षणाची, तसेच त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक केली जाते. तर मुलीच्या लग्नासाठी विविध ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली जाते. सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट किंवा पीपीएफ, म्युच्युअल फंड यासारख्या विविध योजनेत भविष्यासाठी पैसे जमा केले जातात. (Do minors have to file Income Tax Returns Know the details)

प्रत्येक घराघरात मुलांच्या चांगल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक केली जाते. जर तुम्हीही मुलांच्या नावावर गुंतवणूक केली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला ही माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही मुलांच्या नावे गुंतवणूक करत असलेल्या योजनांवर आयकर भरला जातो का? जर कर भरला जात नसेल तर मग गुंतवणूकीच्या पर्यायांमधून मिळणार्‍या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो का? यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडतात.

गुंतवणूकीवरील कमाई कोणत्या उत्पन्नांतर्गत येते? 

मुलांच्या नावे केलेल्या गुंतवणूकीवरील कमाई ही पालकांच्या उत्पन्नामध्ये मोजली जाते. आयकर कलम 64 (1 A) अंतर्गत केवळ पालकांनाच त्यावर कर भरावा लागतो. मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत त्याला अल्पवयीन मानले जाते. मुलांच्या नावावर असणारे कोणतेही बचत खाते, फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर कोणतीही गुंतवणूक तुम्हाला या पैशावर उत्पन्न मिळवून देते.

जर तुमचे आई-वडील दोघेही कमवत असतील तर तुमच्या मुलाचे उत्पन्न हे ज्याचे उत्पन्न जास्त आहे, त्यात जोडले जातात. जर पालकांनी घटस्फोट घेतला असेल तर ते उत्पन्न ज्याच्याकडे मुलाचा ताबा आहे त्याच्या उत्पन्नामध्ये जोडले जाते.

मुलाने एखादी स्पर्धा जिंकली आणि पैसे मिळाले तर..

समजा जर तुमच्या मुलाने एखादी स्पर्धा जिंकली किंवा एखादा टीव्ही शो जिंकला असेल आणि या माध्यमातून त्याला उत्पन्न मिळाले असेल तर त्याला स्वतंत्रपणे आयकर भरावा लागेल. तसेच तुम्ही तुमच्या मुलासाठी अल्पवयीन असतेवेळी पॅन कार्ड देखील बनवू शकता. जे आयकर भरण्यासाठी गरजेचे मानले जाते.

80C अंतर्गत कर सवलत

दरम्यान या गुंतवणूकीच्या पर्यायांवर उपलब्ध कलम 80 सी अंतर्गत पालक देखील सूट मागू शकतात. म्हणजे जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवी इत्यादीवर सूट मागू शकता.

मुलांसाठी केलेल्या गुंतवणूकीवरील करात सूट

जर मुलाच्या नावावर केलेल्या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न 1,500 रुपयांपेक्षा कमी असेल तर ते पालकांच्या उत्पन्नासह जोडले जात नाही. त्याचवेळी जेव्हा हे उत्पन्न पालकांसह एकत्र केले जाते, तेव्हा पालक प्रत्येक मुलाच्या नावे केलेल्या गुंतवणूकीवर 1,500 रुपयांची सूट मागू शकतात.

तसेच जर मुल अपंग किंवा त्याला काही शाररिक व्याधी असतील तर आयकर कलम 80U अंतर्गत त्यांचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडले जाणार नाही.

(Do minors have to file Income Tax Returns Know the details)

संबंधित बातम्या  :

SBI खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर कसा करू शकता क्लेम, जाणून घ्या सोपा मार्ग

‘या’ सरकारी योजनेत दररोज फक्त 7 रुपये वाचवून 60 हजारांपर्यंत पेन्शन मिळवा, गुंतवणुकीचा जबरदस्त फंडा

पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये करा गुंतवणूक, दुप्पट मिळेल फायदा, जाणून घ्या कसा मिळेल लाभ

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.