AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Fraud Alert : सोनू, तुझ्यावर भरवसा नाय नाय! झटपट श्रीमंतीचा मोह नडला, असा लावला चूना

Share Market Fraud Alert : कोरोनानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. यात हौसे, नवसे आणि गवसे सर्वच जण आहे. नेमका हाच धागा पकडून काही भामटे शेअर बाजारातून मालामाल करण्याचे आमिष दाखवत त्यांना गंडा घालत आहे.

Share Market Fraud Alert : सोनू, तुझ्यावर भरवसा नाय नाय! झटपट श्रीमंतीचा मोह नडला, असा लावला चूना
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 6:28 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) हा काही जुगार नाही. पण एखाद्याला कमी वेळेत जोरदार परतावा मिळतो. अल्प गुंतवणुकीत त्याला छप्परफाड कमाई (Huge Return) होते. मग इतरांचे डोळे लुकलुकतात. त्यांनाही मोठी कमाई मिळावे, असे वाटते. पण संयम, अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. मग असे आयते सावज अनेक भामट्यांना मिळतात. त्यांना शेअर बाजारातून तगडी कमाईचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात येते. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात येते. भूलथापा मारुन (Guaranteed Return Fraud) अधिक रक्कम उकळल्यावर हे भामटे (Cheater) गाशा गुंडाळून गायब होतात. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर देशातील प्रमुख शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) गुंतवणूकदारांना जागरुक राहण्याचा इशारा दिला आहे.

NSE वेळोवेळी गुंतवणूकदारांना बाजारातील अशा भामट्यांपासून सावध राहण्याची सूचना करते. त्यांना इशारा देते. एनएसईने कित्येकदा ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना, कोणत्या ही अनोळखी व्यक्ती, संस्था यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हे भामटे हमखात परतावा अथवा इतर आकर्षक ऑफरचे जाळे फेकतात. गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करतात. एनएसईकडे नोंदणीकृत ब्रोकर नसणाऱ्या अनेक व्यक्ती अशी फसवणूक करतात.

एनएसईने परताव्याची हमी देऊन फसवणूक करणाऱ्या महाठग पंकज सोनू याची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार, पंकज सोनू, शेअर बाजारात नव्याने आलेल्या, अथवा बाजाराची फारशी माहिती नसणाऱ्या गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढतो. त्यांना हमखास उत्पन्नाचे आमिष दाखवून फसवतो. ट्रेडिंग मास्टर नावाच्या कंपनीच्या माध्यमातून सोनूने हे फसवणुकीचे जाळे विणले. त्यात अनेकांना गंडा घातला. या जाळ्यात अनेकांना त्यांची मिळकत गमवावी लागली.

हे सुद्धा वाचा

एनएसईने याविषयी एक निवेदन दिले आहे. त्यानुसार, ट्रेडिंग मास्टर या नावाने सोनू अनेकांना गंडा घालत आहे. तो फेक मॅसेज, ई-मेल तसेच व्हॉट्सअप ग्रूपच्या माधम्यातून या आकर्षक ऑफर्स देत आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येते. हा भामटा गुंतवणूकदारांचा युझर आईडी आणि पासवर्ड घेऊन त्यांचे खाते चालवितो. त्यांना कमाई करुन देण्याचे आमिष दाखवतो आणि गंडा घालतो.

कायद्यानुसार, शेअर बाजारातून हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी कोणालाच त्यांचा युझर आयडी आणि पासवर्ड शेअर करु नये. पंकज सोनू याची ट्रेडिंग मास्टर ही कंपनी एनएसईकडे नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.