जूनअखेर ‘ही’ महत्त्वाची काम तातडीने निपटा, अन्यथा मोठं नुकसान निश्चित

जून महिना सुरु होऊन दहा दिवस उलटले आहेत. जून महिन्याची 30 तारीख ही अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. (Do These Some Important Work before 30 June 2021)

जूनअखेर 'ही' महत्त्वाची काम तातडीने निपटा, अन्यथा मोठं नुकसान निश्चित
Money_Rupee_Notes
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 12:15 PM

मुंबई : जून महिना सुरु होऊन दहा दिवस उलटले आहेत. जून महिन्याची 30 तारीख ही अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. या महिना अखेरपर्यंत तुम्हाला पॅन-आधार लिंक करणे, आयएफएससी कोड बदलणे आणि चेकबुक बदलणे यासारख्या अनेक गोष्टी करणे अनिवार्य असणार आहे. (Do These Some Important Work before 30 June 2021 deadline for Update Services)

यासोबतच अनेक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर केवळ 30 जूनपर्यंत वैध असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या महिनाअखेरपर्यंत ही ठराविक काम न केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. येत्या जून अखेरपर्यंत तुम्हाला कोणती काम करायची याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

IFSC कोड अपडेट करणं बंधनकारक

येत्या 1 जुलै 2021 पासून सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड (IFSC Code) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांनी येत्या 30 जूनपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन IFSC कोड अपडेट करावा, असे आदेश कॅनरा बँकेने दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वी कॅनरा बँकेचं सिंडिकेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले. यानंतर सिंडिकेट बँकेने केलेल्या ट्वीटनुसार, SYNB पासून सुरु होणारे eSyndicate IFSC कोड बदलण्यात आले आहेत. SYNB ने सुरु होणारे सर्व IFSC W.E.F 01.07.2021 पासून बंद करण्यात येतील. त्यामुळे सिंडिकेट बँकेतील ग्राहकांना नवीन IFSC कोड अपडेट करावा लागणार आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक

लोकांच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी सरकारने आधार आणि पॅन कार्ड (PAN) जोडणे बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख सातत्याने वाढवण्यात आली होती. त्यानुसार येत्या 30 जून 2021पर्यंत आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही आधारकार्ड पॅनशी जोडलं नसेल तर त्याला 1000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच तुमचे पॅनकार्ड बंद होऊ शकते.

30 जूनपर्यंत या बँकांच्या एफडीवर जास्त व्याज

SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बड़ोदा या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी (FD) योजना सुरू केली. या विशेष योजनेची मुदत 30 जून 2021 रोजी संपत आहे. या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त व्याज मिळते.

(Do These Some Important Work before 30 June 2021 deadline for Update Services)

संबंधित बातम्या :

SBI ग्राहकांसाठी नवी सूचना! अशाप्रकारे करा मोबाईल नंबर अपडेट आणि घरबसल्या अर्ज करून मिळावा ATM कार्ड!

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

या महिन्यात 1 कोटी LPG Gas Connection चं मोफत वितरण! योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ करा

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.