कॅलेंडर उलटण्याआधी पूर्ण करायची चार महत्त्वाची कामं, नाहीतर नव्या वर्षात पडेल भुर्दंड

 जर तुम्ही अद्यापही आयटी रिटर्न दाखल केले नसेल तर तातडीने जमा करा. मुदत वाढवत वाढ सरकारने ती वर्षाअखेर आणली आहे. आता तुम्ही ही जास्त आळसावू नका. 31 डिसेंबरनंतर आयटी रिटर्न जमा केल्यास तुम्हाला भूर्दंड बसेल हे वेगळं सांगायला नको. आयटी रिटर्न सोबतच ही 4 महत्त्वाची कामेही 31 डिसेंबर पूर्वी करून घ्या.  या कामांच्या डेडलाईन अगदी जवळ आलेली आहे.  त्यासाठी आपल्याजवळ फक्त 7 दिवस उरले आहेत. तेव्हा ही कामे उरकून घ्या.

कॅलेंडर उलटण्याआधी पूर्ण करायची चार महत्त्वाची कामं, नाहीतर नव्या वर्षात पडेल भुर्दंड
पीएफ
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:11 AM

आयकर विभागाने यंदा नागरिकांच्या सेवा-सुविधेसाठी नवीन पोर्टल सुरु केले. मात्र नमनालाच घडाभर तेल पडले. या पोर्टलवर नागरिकांना मनस्ताप जास्त सहन करावा लागला. नागरिकांना या तांत्रिक अडचणींचा वारंवार सामना करावा लागत असल्याने आणि कोरोना (Corona) परिस्थितीमुळे 2020-21 या आर्थिक वर्षातील आयकर रिटर्न ( IT Returns) भरण्यासाठी विभागाने दोनदा मुदत वाढ दिली. तांत्रिक अडचणी लक्षात घेता आणि कोरानाचे मळभ हटत नसल्याने ही उपाययोजना करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा संधी देत आयकर विभागाने आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर केली. आता ही डेडलाईन संपायला अवघे 7 दिवस उरले आहेत. या अंतिम तारखेचा विचार  करता त्यापूर्वीच आयटी रिटर्न त्वरित जमा करा. या नंतर आयटी रिटर्न भरल्यास तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल.

पीएफ खात्याला जोडा आधारकार्ड 

जर तुम्ही आतापर्यंत कर्मचारी भविष्यनिर्वाह निर्वाह निधीच्या (EPFO) खात्याशी आधारकार्ड (Aadhar Card) जोडलेले नसेल आणि ई-नॉमिनेशन (e-nomination) अर्ज जमा केला नसेल तर त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर ही आहे, हे लक्षात ठेवा.  ईपीएफओ खात्याशी आधारकार्ड जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे  खातेधारकांनी असे केले नाही,  तर त्यांना भविष्यातील समस्यांना तोंड द्यावे लागेल.  तसेच दाव्याचा निपटारा करताना सुद्धा त्यांच्या वारसदारांना अडचण येण्याची शक्यता आहे.

हयात प्रमाणपत्र त्वरीत जमा करा

निवृत्तीवेतनासाठी हयात प्रमाणपत्र( Life Certificate) जमा करा. सरकारी सेवांमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वर्षभरात एकदा त्यांचा जीवंतपणाचा पुरावा म्हणून हयात प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य आहे. 30 नोव्हेंबर पूर्वी हे प्रमाणपत्र जमा करावे लागते. यंदाची परिस्थिती बघता सरकारने त्यााठी एक महिन्याचा कालावधी वाढून दिला होता. यावर्षी सरकारने याची डेडलाईन  30 सप्टेंबर वरून  31 डिसेंबर पर्यंत वाढवली होती. या अंतिम तारखेच्या आत तुम्ही प्रमाणपत्र जमा न केल्यास तुमची निवृत्तीची रक्कम थांबवण्यात येऊ शकते. तेव्हा 31 डिसेंबरची वाट न पाहता कर्मचाऱ्यांनी त्यांचे हयात प्रमाणपत्र लवकरात लवकर जमा करावे.

डिमॅट-ट्रेडिंग अकाउंटचे केवायसी अपडेट

डिमॅट-ट्रेडिंग अकाउंटचे (Demat-Trading Account) केवायसी अपडेट (KYC Update) करून घ्या.  सेबीने (SEBI) डिमॅट आणि ट्रेडिंग खातेधारकांना  केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. पूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर अशी होती, ती आता 31 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. केवायसी अंतर्गत नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल,  स्वाक्षरी,  तुमचे ओळखपत्र यासंबंधीची माहिती अपडेट न केल्यास तुमचे डिमॅट-ट्रेडिंग अकाउंट बंद होऊ शकते. तेव्हा त्वरित केवायसी अपडेट करा

संबंधित बातम्या : 

Tokenization | टोकनायझेशनला मुदतवाढ, RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय, ऑनलाईन व्यवहारांची नवी पद्धत कशी असणार? नव्या वर्षात खिशाला कात्री; काय स्वस्त, काय महागं? जाणून घ्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.