स्टारबक्सच्या सीईओना किती मिळतो पगार माहीतेय का ? गुगलच्या सीईओ पेक्षा जादा कमाई
प्रसिद्ध कॉफी सर्व्हीस कंपनी स्टारबक्सच्या सीईओच्या पगाराची माहिती कंपनीने जाहीर केली आहे. कंपनीच्या अहवालानुसार गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि टिम कुक यांच्या पगारापेक्षा जास्त वेतन त्यांना मिळत आहे.

जगात सर्वाधिक पगार कोणाला मिळतो याची उत्सुकता कायम असते. याआधी आपण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि एप्पल कंपनीचे प्रमुख टीम कूक यांची नावे तगड्या पगारासाठी ऐकूण होतो. परंतू तुम्हाला माहिती आहे का याच्याहून अधिक वेतन कोणाला मिळते. कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्सचे सीईओना सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त पगार आहे.सुंदर पिचाई आणि टीम कूक यांना वार्षिक ७५ दशलक्ष वेतन मिळते. तर स्टारबक्सचे सीईओ ब्रायन निकोल यांना गेल्या चार महिन्यात ९६ दशलक्ष डॉलर म्हणजे ( सुमारे ८२७ कोटी रुपये ) पगार मिळाला आहे. ते आठवड्यातून केवळ तीन दिवस ऑफीसला येतात. या हिशेबाने त्यांना एक दिवस ऑफीसला येण्यासाठी ६८ कोटी रुपये मिळतात.
पगारात कोणते सुविधा
स्टारबक्सच्या अहवालानुसार सीईओ ब्रायन निकोल यांना घरभाडे भत्ता, ट्रॅव्हल्स अलाऊन्स आणि पर्सनल युजच्या खर्चाचा समावेश केला आहे.त्यांना घरभाडे भत्ता म्हणून १४३,००० डॉलर मिळतात. तर पर्सनल युजसाठी १९,००० डॉलर मिळतात. या शिवाय कंपनी त्यांना येण्याजाण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील पुरवित आहे. ज्यासाठी त्यांना ७२,००० डॉलर मिळतात. तर ते आठवड्यातून तीन दिवस ऑफीसला येतात.




लक्ष्मण नरसिम्हन होते आधी सीईओ
ब्रयान निकोल हे चार महीन्याआधी कंपनीचे सीईओ म्हणून जॉईंट झाले होते.त्याआधी लक्ष्मण नरसिम्हन हे सीईओ होते. कंपनी जेव्हा यूनियन वर्कर मुव्हमेंट आणि तोट्यात गेली होती तेव्हा निकोल ब्रयान जॉईट झाले. तेव्हाच त्यांच्या पॅकेजी चर्चा झाली होती.