Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motivational Speaker : सौंदर्याला बुद्धिमत्तेचे कोंदण! कोट्यवधी संपत्तीची मालकीण, लग्नासाठी या मोटिव्हेशनल स्पीकरला हवा असा तरुण

Motivational Speaker : कोट्यवधींची मालकीण असलेल्या या मोटिव्हेशनल स्पीकरला आयुष्याचा असा जोडीदार हवा आहे.

Motivational Speaker : सौंदर्याला बुद्धिमत्तेचे कोंदण! कोट्यवधी संपत्तीची मालकीण, लग्नासाठी या मोटिव्हेशनल स्पीकरला हवा असा तरुण
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 9:50 AM

नवी दिल्ली : लोकप्रिय मोटिव्हेशनल स्पीकर (Motivational Speaker)  आणि कथा वाचन करणाऱ्या जया किशोरी (Jaya Kishori) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत. सध्या मीडियात वादशी नाव जोडलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krushna Shastri) यांच्यासोबत लग्नाच्या वावड्या उठल्या आहेत. जया किशोरी आणि पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याच्या अफवा उठल्या आहेत. अर्थात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तर जया किशोरी यांनी एका मुलाखतीत त्यांना कसा जोडीदार हवा, ही अपेक्षा व्यक्त केली.

एका खासगी वाहिनीला जया किशोरी यांनी मुलाखत दिली. त्यात लग्नाविषयीची त्यांची बाजू मांडली. लग्नासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या तरुणाच्या गळ्यात त्या वरमाला घालतील. ज्या तरुणाने ही अट पूर्ण केली, त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

जया किशोरी यांची अट फारच क्लिष्ट वा कठिण नाही. त्यांचे आई-वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांना सोडून त्या राहू शकत नाही. त्यामुळे लग्नानंतर त्यांचे आई-वडिल जवळच्याच परिसरात रहावे, असे त्यांना वाटते. त्यांच्या मते, लग्न कोलकतामध्ये झाले तर अजून चांगले, कारण त्यांचे आई-वडिल या शहरात राहतात.

सोशल मीडियामध्ये जया किशोरी यांचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. फेसबुकवर त्यांचे 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर जवळपास 50 लाख फॉलोअर्स आहेत. अनेक लोक त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे चाहते आहेत. त्यांच्या भाषणांनी अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते.

जया किशोरी या मुळच्या राजस्थानमधील सुजानगढ येथील आहेत. जुलै 1995 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव जया शर्मा आहे. लोक त्यांना किशोरी जी या नावाने ओळखतात. त्यांच्या वडिलांचे नाव शिव शंकर शर्मा आहे. त्यांच्या बहिणीचे नाव चेतना शर्मा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जया किशोरी या कोट्यवधी संपत्तीच्या मालकीण आहेत. त्यांच्याकडे जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. कथेचे वाचन करणे आणि प्रेरणादायी विचार मांडणे हेच त्यांचे साधन आहे. देशातील विविध शहरात जाऊन त्या कथा वाचन करतात.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.