Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रतन टाटा आणि बिल गेट्स सारखं यशस्वी व्हायचंय? मग तुमच्या या 8 गोष्टींवर करा काम

लाइफ मॅनेजमेंटच्या अभावामुळे यश आपल्या हातून निसटत जाते. तुम्हालाही बिल गेट्स, एलन मस्क, रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासारख्या लोकांप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल करा. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण दररोज सकाळी केल्या पाहिजेत.

रतन टाटा आणि बिल गेट्स सारखं यशस्वी व्हायचंय? मग तुमच्या या 8 गोष्टींवर करा काम
ratan tataImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 3:42 PM

मुंबई: जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यश मिळवायचे असते. बिल गेट्स, एलन मस्क, रतन टाटा, मुकेश अंबानी आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासारखंच यश मिळवावं आणि आणि जगावर राज्य करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र अनेकदा लाइफ मॅनेजमेंटच्या अभावामुळे यश आपल्या हातून निसटत जाते. तुम्हालाही बिल गेट्स, एलन मस्क, रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासारख्या लोकांप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल करा. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण दररोज सकाळी केल्या पाहिजेत.

  1. यशस्वी लोक कोणत्याही अलार्मशिवाय सकाळी लवकर उठतात, ते निरोगी राहण्यासाठी 8 तासांची झोप नक्कीच पूर्ण करतात. तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
  2. यशस्वी लोक आपल्या दिवसाची सुरुवात पाण्याने करतात. सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्या, त्यानंतरच तो चहा-कॉफीचे सेवन करतो.
  3. यशस्वी लोक नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ते कितीही व्यस्त असले तरी त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नक्कीच चांगले राहते. निरोगी राहण्यासाठी ते आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये व्यायामाचा नक्कीच समावेश करतात. तुम्ही सुद्धा व्यायाम कारालाच हवा.
  4. यशस्वी लोक आपला वेळ वाया घालवणे टाळतात. ते रोज आपल्या महत्त्वाच्या कामांची यादी तयार करतात आणि ते पूर्ण करण्यात आपला वेळ घालवतात.
  5. यशस्वी लोक सकाळी काही वेळ वर्तमानपत्रे किंवा चांगली पुस्तके वाचण्यात घालवतात.
  6. यशस्वी व्यक्तींची सवय म्हणजे निर्णय घेणे. अशी लोकं निर्णय घेण्याची कामे सकाळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
  7. दिवसभर स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी यशस्वी लोकांना हेल्दी ब्रेकफास्ट घेणे आवडते. याशिवाय तो जास्त तेलकट आणि जंक फूड खाणेही टाळतात.
  8. यशस्वी लोक सकाळी इतर कुठलाही विचार न करता भविष्यातील उन्नतीचा विचार करतात, यामुळेच ते जीवनात अधिक प्रगती कशी करू शकतात.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.