Donate Crores : हेच ते वेड! कॉलेजसाठी दान केले 315 कोटी रुपये, कोण आहे हा दानशूर

Donate Crores : आयुष्यात कधी कधी असा वेडेपणा करणे गरजेचे असते. पण अशी हिंमत काही जणांमध्येच असते. अफाट संपत्ती असताना ही काही जणांना पैसा सूटत नाही. पण ही दानशूर व्यक्ती त्याला अपवाद आहे..

Donate Crores : हेच ते वेड! कॉलेजसाठी दान केले 315 कोटी रुपये, कोण आहे हा दानशूर
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 5:04 PM

नवी दिल्ली : आयुष्यात कधी कधी असा वेडेपणा करणे गरजेचे असते. पण अशी हिंमत काही जणांमध्येच असते. अफाट संपत्ती असताना ही काही जणांना पैसा सूटत नाही. पण ही दानशूर व्यक्ती त्याला अपवाद आहे. त्यांनी त्यांच्या कॉलेजसाठी 315 कोटी रुपये दान (Donate Crores) केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुबंईला (IIT) ही संपत्ती दान करण्यात आली. कोणत्याही विद्यार्थ्याने त्याच्या महाविद्यालय, इन्सिट्यूटसाठी केलेले हे सर्वात मोठे दान आहे. आयआयटी मुंबईतून उत्तीर्ण होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या बिझनेसमनने एवढी मोठी रक्कम दान करण्याची घोषणा केली. अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली.

आतापर्यंत 400 कोटींचा निधी अर्थात आयआयटी मुंबईला विद्यार्थ्यांनी दिलेली ही पहिली सप्रेम भेट नाही. यापूर्वी आयआयटी मुंबईला 85 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. म्हणजे आतापर्यंत आयआयटी मुबंईला जवळपास 400 कोटी रुपयांचं दान मिळाले आहे. या इन्स्टिट्यूटमुळे अनेक विद्यार्थी घडले. त्यांनी जगात त्यांच्या नावाचा झेंडा फडकवला. या दान रक्कमेतून या संस्थेला अनेक प्रकल्प सुरु करण्यासाठी मदत मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

नंदन निलेकणी यांचा दानशूरपणा इन्फोसिसचे (Infosys)सह संस्थापक नंदन निलेकणी (Nandan Nilekani) यांनी 315 कोटी रुपये दान केले आहेत. याविषयीची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. त्यांनी आयआयटी मुंबईवरील प्रेमच या पोस्टमधून व्यक्त केले. ही संस्था आपल्या जीवनाचा आधारस्तंभ असल्याचे गुणगान त्यांनी केले. येथून जीवनाला आकार मिळाला. नवीन वाटा शोधता आल्या. या संस्थेविषयीचा मनातील हळवा कोपरा त्यांनी उघड केला. हे दान म्हणजे केवळ आर्थिक मदत आहे. त्यापेक्षा प्रेम महत्वाचे असल्याचे संकेत त्यांनी दिले. ही संस्था येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आकार देईल. त्यांना घडवेल, असं विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोण आहेत निलेकणी नंदन निलेकणी यांचा जन्म 2 जुलै 1955 रोजी कर्नाटकमध्ये झाला होता. त्यांच्या आईचे नाव दुर्गा आणि वडिलांचे नाव मनोहर निलेकणी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरुमध्ये झाले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर आयआयटी मुंबईतून त्यांनी अभियांत्रिकीचे धडे गिरवले. रोहिणी यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत.

आधार कार्डचे जनक नंदन निलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आधार कार्ड. देशातील प्रत्येक नागरिकाला विशिष्ट ओळख क्रमांक यशस्वीरित्या देण्याचे कार्य त्यांच्यामुळे झाले. त्यांनीच UIDAI ही योजना भारतात राबविली. 12 अंकांचा विशिष्ट ओळख क्रमांक भारतीयांना मिळाला. अर्थात त्याचे श्रेय निलेकणी यांनाच जाते. 2006 मध्ये त्यांच्या कार्याचा गौरव पद्म भूषण पुरस्कार देऊन करण्यात आला. त्यांनी टोरँटो विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ लॉ हा किताब मिळवला.

Non Stop LIVE Update
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.