महागाईमुळे ‘या’ देशावर आली होती दहा लाखांची नोट छापण्याची वेळ, सध्या परिस्थिती नियंत्रणात
जगभरात सध्या श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची चर्चा होत आहे. मात्र अशीच परिस्थिती काही दिवसांपूर्वीव्हेनेझुएला आणि झिम्बाब्वेवर देखील आली होती.
जगभरात सध्या श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची चर्चा होत आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत दैनीय बनली असून, अत्यावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र तरी देखील इंधन मिळत नसल्याने लोकांना पेट्रोलपंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो यापूर्वी व्हेनेझुएला आणि झिम्बाब्वेमध्ये देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. या देशांमध्ये महागाई निंयणाबाहेर (Hyperinflation) गेली होती. आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईमुळे दक्षिण अमेरिकेमध्ये असलेला देश व्हेनेझुएलाच्या (Venezuela) सरकारवर दहा लाखांची नोट छापण्याची वेळ आली होती. गेल्या काही महिन्यात येथील सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र आजूनही परिस्थितीमध्ये म्हणावी अशी सुधारणा झालेली नाही. जाणून घेऊयात सध्या व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती कशी आहे.
चलन धोरणात सुधारणा
व्हेनेझुएलाच्या चलन मुल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या स्थितीमध्ये 4.42 सॉवरेन बोलिवरचे (व्हेनेझुएलाचे चलन) मुल्य एक अमेरिकन डॉलर एवढे आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी तेथील सरकारने ऑक्टोबर 2021 मध्ये काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलली होती. व्हेनेझुएलाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या चलनातून सहा शून्य हटवले होते. म्हणजेच एक लाख बोलिव्हर एका सॉवरेन बोलिव्हरमध्ये बदलण्यात आले होते. एवढेच नाही तर 100 सॉवरेन बोलिव्हर ही देशातील सर्वात मोठी नोट बनवण्यात आली होती. यामुळे व्हेनेझुएलाच्या चलनामध्ये मोठी सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले.
देशातील महागाईचा दर
Expatistan डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार व्हेनेझुएलामध्ये 500 ग्रॅम बोनलेस चिकनची किंमत 2.94 डॉलर आहे, तर 12 अंड्यांची किंमत 2.93 इतकी आहे. भारतामध्ये तुम्हाला बारा अंडे खरेदी करायचे असल्यास सध्या 1.08 डॉलर खर्च करावे लागतात. व्हेनेझुएलामध्ये आजूनही टोमॅटो महागच आहे. एक किलोग्रॅम टोमॅटो खरेदी करण्यासाठी तुम्हाला तिथे 1.40 डॉलर मोजावे लागतात. 2019 तुलनेमध्ये देशातील महागाई मोठ्याप्रमाणात नियंत्रणता आली आहे, मात्र अद्यापही काही वस्तुंचे भाव तसेच आहेत. सध्या श्रीलंका देखील अशाच संकटातून जात आहे.
इतर बातम्या
‘गॅस आणि इंधनांचे दर वाढत चालले आहेत’ विमानातच काँग्रेस महिला नेत्यांचा स्मृती इराणींना सवाल