घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवून कमावले 4 लाख कोटी; तुम्हीही व्हा भागिदार; झोमॅटोने दिली कमाईची संधी

झोमॅटोने प्रस्तावित आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे (डीआरएचपी) सादर केली आहेत. त्या कागदपत्रांनुसार आयपीओच्या माध्यमातून 8250 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. (earned 4 lakh crore by delivering food to households; Be a partner too; Zomato gave a chance to earn)

घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवून कमावले 4 लाख कोटी; तुम्हीही व्हा भागिदार; झोमॅटोने दिली कमाईची संधी
झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 5:35 PM

नवी दिल्ली : एखाद्या दिवशी आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येतो किंवा आपण एखाद्या महत्वाच्या कामात अडकलो असू आणि घरी येऊन बनवणे शक्य नसेल तर आपल्या डोळ्यासमोर चटकन झोमॅटोसारखा पर्याय उभा राहतो. यावरून कंपनीच्या लोकप्रियतेची कल्पना येते. या कंपनीचा वाटचालीचा एकूण प्रवास थक्क करणारा आहे. घरोघरी जेवण पोहोचवून या कंपनीने आजच्या घडीला तब्बल 4.05 लाख कोटींपर्यंत मजल मारली आहे. आता तर या कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ विक्रीला काढून आपल्या ग्राहकांना कमाईची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. (earned 4 lakh crore by delivering food to households; Be a partner too; Zomato gave a chance to earn)

प्रस्तावित आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर

कंपनीच्या आयपीओसंबंधित कागदपत्रांतूनच एकूण उत्पन्नाचा आकडा समोर आला आहे. झोमॅटोने प्रस्तावित आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे (डीआरएचपी) सादर केली आहेत. त्या कागदपत्रांनुसार आयपीओच्या माध्यमातून 8250 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. यातून उभा राहणारा निधी व्यवसायाचा विस्तार तसेच जनरल कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आर्थिक स्थितीबाबत बोलायचे झाल्यास मार्च 2020 मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न 2486 कोटी रुपये इतके होते. परंतु सध्या कंपनीची तोट्यात वाटचाल सुरू आहे. कोरोना महामारीमुळे सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे.

कमाईची संधी कशी मिळणार?

कोणतीही कंपनी शेअर बाजाराच्या माध्यमातून पैसे जमावण्याचा विचार करते, त्यावेळी त्या कंपनीला आयपीओ जारी करावे लागतात. आपयीओच्या माध्यमातून कंपनीचा मालक आपली हिस्सेदारी विकतो. आयपीओ म्हणजे कोणतीही कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात लिस्ट होते, त्यावेळी त्या कंपनीला काही शेअर्स जारी करावे लागतात. यालाच इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ म्हटले जाते. झोमॅटो कंपनी अशाच प्रकारे आयपीओ जारी करणार आहे. या आयपीओमध्ये पैसे गुंतवून आपल्याला मोठी कमाई करता येणार आहे. आधी आयपीओला मंजुरी मिळेल व त्यानंतर आयपीओ ओपन होण्याची आणि बंद होण्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

2008 मध्ये कंपनीची सुरुवात

झोमॅटो एक भारतीय रेस्टॉरंट एग्रीगेटर आहे. या कंपनीची सुरुवात 2008 मध्ये पंकज चड्ढा आणि दीपेंद्र गोयल यांनी केली होती. दीपेंद्र रोजच्या प्रमाणे कार्यालयात गेले होते आणि कॅन्टिनमध्ये जेवणाच्या मेन्यूची वाट पाहत होते. त्यात खूप वेळ वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी जेवणाचे मेन्यू स्कॅन करून ऑनलाईन टाकले, त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. याचवेळी त्यांच्या डोक्यात झोमॅटो कंपनी उभारण्याची आयडिया आली. ऑनलाईन मेनूला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे त्यांनी वेबसाइट उघडण्याचा विचार केला, जेणेकरून लोकांना आसपासच्या रेस्टॉरंटची माहिती मिळेल. त्यांनी कार्यालयातील मित्र पंकज चढ्ढा यांना सोबत घेऊन 2008 मध्ये फूडीबे वेबसाईट सुर केली. त्यात रेस्टॉरंटच्या मेन्यूबाबत समीक्षा केली जात होती. यावेळी झोमॅटोने प्रत्येक शहरातील रेस्टॉरंटसोबत करार केला. या रेस्टॉरंटमधून जेवणाची सामान्यांच्या घरापर्यंत डिलीव्हरी करण्याचे काम झोमॅटोने सुरू केले. लॉकडाऊन काळात झोमॅटोने घराघरापर्यंत ग्रोसरी पोहोचवण्याचेही काम केले. (earned 4 lakh crore by delivering food to households; Be a partner too; Zomato gave a chance to earn)

इतर बातम्या

हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या

मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, थेट पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा, पोलीस कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.