ईस्ट इंडिया कंपनीने भारताला बनवले होते गुलाम, आज ती कंपनी भारतीयांची गुलाम…मालक भारतीय
East India Company: ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती. परंतु ती भारतीयाची नाही तर ब्रिटनची होती. परंतु आता काळाने त्या कंपनीवर सूड उगारला आहे. भारतीय वंशाचे संजीव मेहता यांनी 2010 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी 15 दक्षलक्ष डॉलर म्हणजेच 125 कोटीत घेतले. तेव्हापासून ती त्यांच्या ताब्यात आहे.
ईस्ट इंडिया कंपनीचे नाव शाळेच्या इतिहासात सर्वांना गेले आहे. 16 शतकात ही कंपनी भारतात आली. त्यानंतर हळहळू संपूर्ण देशावर आपले राज्य सुरु केले. 1857 पर्यंत भारतावर या कंपनीचा राज होता. त्याला कंपनी राज म्हटले जात होते. त्यानंतर ब्रिटन अन् फ्रॉन्सची भारतात एन्ट्री झाली. आजही या कंपनीचे नाव आणि कामकाज सुरु आहे. पण भारतीयांना गुलाम बनवणारी ही कंपनी आज भारतीयांची गुलाम झाली आहे. या कंपनीची मालकी आता भारतीयांकडे आहे.
अशी बसवले भारतात बस्तान
ब्रिटीश साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला चालना देण्यासाठी 17 व्या शतकाच्या सुरूवातीस ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना मुळात व्यापारासाठी झाली असली तरी ब्रिटिश राजवटीने तिला अनेक विशेष अधिकारही दिले होते. या विशेषाधिकारांमध्ये युद्ध करण्याचा अधिकार दिला होता. यामुळे कंपनीकडे स्वतःचे शक्तिशाली सैन्य होते.
सुरतमध्ये उघडला पहिला कारखाना
पोर्तुगाल भारतातून मसाले भरून नेत होते. परंतु ईस्ट इंडियाने प्रथम या जहाजांना लक्ष्य केले आणि पूर्वीच्या अहवालानुसार, पहिले जहाज लुटल्यानंतर, ईस्ट इंडिया कंपनीला 900 टन मसाले मिळाले, ज्याची विक्री करून कंपनीला मोठा नफा मिळाला. लुटीचा हा प्रकार सुरुच राहिला. इस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली मुळे जमवण्यास सुरुवात केली. सर थॉमस रो ने मुगल बादशाहकडून भारतात व्यापारचा अधिकार मिळवला. त्यानंतर कोलकातामधून काम सुरु केले. त्यानंतर चेन्नईपासून मुंबईपर्यंत काम सुरु केले. कंपनीने 1613 मध्ये सूरतमध्ये पहिल्या कारखान्याची निर्मिती केली. त्यानंतर हळहळू देशभरात आपली सत्ता स्थापन केली. 1857 मध्ये झालेल्या बंडानंतर ब्रिटिश साम्राज्याने भारतातील शासन आपल्या ताब्यात घेतले.
भारतीयाच्या ताब्यात कंपनी
ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती. परंतु ती भारतीयाची नाही तर ब्रिटनची होती. परंतु आता काळाने त्या कंपनीवर सूड उगारला आहे. भारतीय वंशाचे संजीव मेहता यांनी 2010 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी 15 दक्षलक्ष डॉलर म्हणजेच 125 कोटीत घेतले. तेव्हापासून ती त्यांच्या ताब्यात आहे. कधीकाळी युद्धाच्या मैदानात असलेली ही कंपनी आता चहा, कॉफी, चॉकलेट विकत आहे.