‘या’ खासगी बँकेत व्हिडीओ KYC अपडेट करणे सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, केवायसी अपडेट करणे आता सोपे आहे. बाहेर जाण्याची गरज नाही, फक्त IDBI बँक व्हिडीओ KYC किंवा i Net Banking वापरा किंवा 9820346920 वर SMS - RKYC पाठवा आणि सहजतेने प्रक्रिया पूर्ण करा.
नवी दिल्लीः केवायसी अपडेट करणे आता सोपे झालेय. आयडीबीआय बँकेने, जी सरकारी ते खासगी बँकेत रुपांतरीत झाली. त्या बँकेनं आता ग्राहकांना घरी बसून सहजपणे केवायसी अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय, यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. आयडीबीआय बँकेने संपूर्ण तपशील दिला आहे, जेणेकरून ग्राहक त्यांचे केवायसी डिजिटल किंवा ऑनलाईन मोडद्वारे अपडेट करू शकतील. IDBI बँकेने ट्विट करून ही माहिती दिली.
आता शाखांना भेट न देता त्यांचे केवायसी व्ही-सीआयपीद्वारे अद्ययावत होणार
बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, केवायसी अपडेट करणे आता सोपे आहे. बाहेर जाण्याची गरज नाही, फक्त IDBI बँक व्हिडीओ KYC किंवा i Net Banking वापरा किंवा 9820346920 वर SMS – RKYC पाठवा आणि सहजतेने प्रक्रिया पूर्ण करा. आयडीबीआय बँकेने सुरू केलेल्या विविध डिजिटल उपायांच्या अनुषंगाने ग्राहक आता शाखांना भेट न देता त्यांचे केवायसी व्ही-सीआयपीद्वारे अद्ययावत करू शकतात. बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या V-CIP लिंकद्वारे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार प्रक्रिया सुरू करू शकतात. ही पूर्णपणे संपर्कविरहित प्रक्रिया आहे.
Updating KYC is now simple! No need to step out, simply use IDBI Bank Video KYC or I net Banking or send an SMS – RKYC to 9820346920 and complete the process easily! #GoDigital #HappyBanking
For more details, visit: https://t.co/VnVlgksps2 pic.twitter.com/kODkrM1koy
— IDBI BANK (@IDBI_Bank) September 30, 2021
या प्रकारे केवायसी अपडेट करा
>> हे काम तुम्ही SMS द्वारे करू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9820346920 या क्रमांकावर RKYC लिहून मेसेज पाठवावा लागेल. यापूर्वी बँकेकडून मेसेज येतो, त्यानंतर हा मेसेज पाठवावा लागतो. >> बँकेकडून आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक आहे, ज्यावर क्लिक करावे लागेल. मेसेजच्या बदल्यात, बँक नोंदणीकृत मेल आयडीवर मेलदेखील पाठवते, ज्यामध्ये लिंक दिली आहे. >> केवायसी अद्ययावत करण्याची सुविधा इंटरनेट बँकिंगमध्येही उपलब्ध आहे. येथे Service & Request वर जा आणि Net Banking वर क्लिक करा. >> ग्राहक हवे असल्यास व्हिडिओ-केवायसी देखील करू शकतात. ही लिंक बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तेथे व्हिडिओ लिंकची संपूर्ण प्रक्रिया देखील सांगितली जाते. >> व्हिडिओ केवायसी रविवार आणि बँक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत करता येते. जर ग्राहकाला ऑनलाईन काम करताना कोणतीही गैरसोय होत असेल किंवा प्रक्रिया समजून घेण्यात अडचण येत असेल तर तो बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतो. या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवा किंवा उपाय विचारा, बँकेकडून पूर्ण मदत आहे. तुम्ही 1800 209 4324, 1800 22 1070, 022 67719100 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
संबंधित बातम्या
गौतम अदानींची कोरोना काळात बंपर कमाई, मुकेश अंबानींनी किती कमावले?
1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकेची ATM सेंटर्स बंद, ग्राहकांना पैसे कसे मिळणार?