देशात आर्थिक विषमता वाढली; केवळ 10 टक्के लोकांकडे 57 टक्के संपत्ती
भारतामध्ये आर्थिक असमानता दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाकाळात तर त्यात आणखी भर पडली आहे. आर्थिक असमानतेबाबत नुकताच पॅरिस स्थित वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅबकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारतामध्ये आर्थिक असमानता दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाकाळात तर त्यात आणखी भर पडली आहे. आर्थिक असमानतेबाबत नुकताच पॅरिस स्थित वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅबकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार सर्वाधिक आर्थिक विषमता असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश झाला आहे. या अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील दहा टक्के श्रीमंत लोकांनी सरासरी 11,65,520 रुपयांची कमाई केली. तर दुसरीकडे देशातील 50 टक्के लोकांची सरासरी कमाई ही केवळ 53,610 इतकी होती.
अहवालामध्ये काय म्हटले आहे?
या अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की, भारतामधील टॉप एक टक्का श्रीमंताचा देशाच्या एकूण उत्पान्नमध्ये 22 टक्के वाटा आहे. जर देशातील दहा टक्के श्रीमंत यामध्ये समाविष्ट केल्यास हा आकडा 57 टक्क्यांवर जातो. याचा अर्थ असा की, देशातील एकूण उत्पन्नापैकी 57 टक्के उत्पन्न हे दहा टक्के लोकांकडे आहे. तर उर्वरीत 43 टक्के उत्पन्न हे 90 टक्के लोकांकडे आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बीपीएल रेषेखाली असेल्या लोकांच्या संख्येमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या एक वर्षामध्ये दिवसाला 150 रुपयांपेक्षा कमी कमावणाऱ्या लोकांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.
असमानता का वाढली?
असमानता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे धन संचयन आहे. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के संपत्ती ही दहा टक्के लोकांकडे आहे. तर 90 टक्के लोकांकडे केवळ 30 टक्के संपत्ती आहे. परिणामी बऱ्याच जणांना कामाच्या संधी नाकारल्या जातात. काम मिळाले तर ते देखील अल्प मोबदल्यात करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात अनेकांनी आपले रोजगार गमावले. ज्यांचे हातावर पोट होते त्यांना मोठा फटका बसला. मात्र जे श्रीमंत होते त्यांना कोरोनाचा म्हणावा एवढा फटका बसल्याचे दिसून येत नाही. कोरोना काळात अनेकांनी रोजगार गमावल्याने देखील गेल्या दोन वर्षांमध्ये ही आर्थिक विषमता आणखीनच वाढीला लागल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
सोने, चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मसाल्यांना मोठी मागणी; सात वर्षांमध्ये निर्यात साठ टक्क्यांनी वाढली