Petrol Diesel Price Today : मोदी सरकारची करामत, इंधनाच्या आघाडीवर शांतता, पेट्रोल-डिझेलबाबतीत पुन्हा दिलासा!

Petrol Diesel Price Today : देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जवळपास स्थिर आहेत. त्यात लक्षणीय बदल झालेला नाही. सध्या जगभरात आर्थिक वादळानं हाहाकार घातला आहे. आपल्या शेजारील राष्ट्रात इंधन दरवाढीने महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. त्यामानाने आपल्या अर्थव्यवस्थेला कमी धोका आहे.

Petrol Diesel Price Today : मोदी सरकारची करामत, इंधनाच्या आघाडीवर शांतता, पेट्रोल-डिझेलबाबतीत पुन्हा दिलासा!
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली : जगात आर्थिक वादळ (Economic Crisis) घोंगावत आहे. महासत्ता अमेरिका, युरोपातील अनेक देश महागाईने होरपळत आहे. येथील बँकिंग प्रणालीला मोठा दणका बसला आहे. बँका धडाधड बंद होत आहे. दुसरीकडे अनेक छोट्या देशांना इंधनाच्या किंमती रोखता आल्या नाहीत. ते दिवाळखोरीत निघाले आहेत. तर काहींना या परिस्थितीतून मार्ग काढणे कठीण जात आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात मोठी वाढ झालेली नाही. आता रशियाचे तेल उत्पादन घटले आहे. पण या सर्वांचा भारतीय इंधन पुरवठ्या सध्या परिणाम होणार नाही. भारताने वेळीच पाऊल टाकल्याने देशात इंधन दरवाढीचा आगडोंब उसळला नाही. आता घरगुती उत्पादनावर विंडफॉल कर कमी केल्याने निदान पेट्रोलच्या किंमती (Petrol Price) घसरण्याची दाट शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात मोठा फेरबदल झाला आहे. रशियाच्या कच्चा तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. 22 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) मध्ये वाढ होऊन ते 70.15 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) आजचा भाव 76.03 डॉलर प्रति बॅरल आहे. या अपडाऊनमध्ये जनतेला मात्र कोणतीही झळ बसलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) लक्षणीय बदल झालेला नाही.

500,000 बॅरल उत्पादन घटवले

हे सुद्धा वाचा

रशियाने कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या जून अखेरपर्यंत प्रतिदिन 500,000 बॅरल तेल उत्पादनात कपात करण्यात येणार आहे. हा निर्णय या देशाने स्वेच्छेने घेतला आहे. त्यासाठी कोणताही दबाव नाही. इंधन कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी मंगळवारी जाहीर केले. अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठा हा निर्णय घेण्यात आल्याचे संकेत नोव्हाक यांनी दिले. पाश्चिमात्य राष्ट्र ऑईल मार्केट कॅप बदलण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप नोव्हाक यांनी केला.

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.