Adani Damani : या धनकुबेरांवर ‘लक्ष्मी’ रुसली! कोट्यवधी रुपये स्वाहा

Adani Damani : अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्ती मोठी घसरण झाली आहे. अदानी समूहाला बसलेला फटका हा सध्या राष्ट्रीय विषय ठरला आहे. पण केवळ अदानीच नाही तर या अब्जाधीशावरही लक्ष्मी रुसली आहे. त्यांनाही यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Adani Damani : या धनकुबेरांवर 'लक्ष्मी' रुसली! कोट्यवधी रुपये स्वाहा
असा बसला फटका
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 6:13 PM

नवी दिल्ली : यंदाचे वर्ष भारतीय उद्योगपतींची परीक्षा पाहत आहे. गौतम अदानी (Gautam Adani) तर सध्याचे आपल्यासमोरील जीवंत उदाहरण आहे. त्यांनी एकाच महिन्यात एवढी संपत्ती गमावली की, त्यात सध्या दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या पाकिस्तानचे भले झाले असते. जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेले गौतम अदानी सध्या टॉप-30 यादीतूनही बाहेर फेकले गेले आहेत. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत पण घसरण झाली आहे. अदानी इतका त्यांना फटका बसला नाही, एवढेच ते काय नशीब. तर डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांना ही यंदाचे वर्ष लक्की ठरले नाही. अदानी-अंबानी प्रमाणेच लक्ष्मी त्यांच्यावर रुसली.

राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती (Radhakishan Damani Net Worth) मोठी घसरण झाली. त्यांच्या कंपनीतील दिग्गज गुंतवणूकदारांनाच 1 जानेवारीपासून आतापर्यंत 2.67 अब्ज डॉलरचे (22,143 कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागले आहे. एकूण संपत्ती आलेल्या घसरणीमुळे दमानी टॉप संपत्ती गमाविणाऱ्यांच्या यादीत सहभागी झाले आहेत. 2023 मध्ये सर्वाधिक संपत्ती गमाविणाऱ्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत राधाकिशन दमानी हे तिसऱ्या स्थानी आहेत.

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, मोठी संपत्ती गमावल्यानंतरही राधाकिशन दमानी यांचे एकूण नेटवर्थ 16.7 अब्ज डॉलर आहे. एवढ्या संपत्तीच्या बळावर ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत 97 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षात दमानी यांनी संपत्तीतील जवळपास 14 टक्के वाटा गमावला आहे. मुंबईकर असलेल्या राधाकिशन दमानी यांनी रिटेल चेन डीमार्टच्या माध्यमातून भारतभर मोठे साम्राज्य उभे केले आहे. ते शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार आहेत. भारतीय बिग बूल राकेश झुनझुनवाला हे दमानी यांना गुरु मानत होते. देशात सध्या 238 डीमार्ट स्टोअर्स आहेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी, 2022 मध्ये झपाट्याने श्रीमंत होणाऱ्या उद्योगपतीत गौतम अदानी अव्वल स्थानी होते. तर यावर्षी झरझर संपत्ती गमाविणाऱ्या उद्योजकातही त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन संशोधन फर्म हिंडनबर्ग अहवाल सार्वजिनक झाला आणि अदानी यांच्या घराचे वासे फिरले. त्यांच्या साम्राज्याला जोरदार हादरा बसला. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्सुनामी आली. अजूनही त्यांचा समूहा या धक्क्यातून सावरलेला नाही. जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेले गौतम अदानी सध्या टॉप-30 यादीतूनही बाहेर फेकले गेले आहेत.

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि आशियातील श्रीमंत मुकेश अंबानी यांनाही यंदा फटका बसला. सर्वाधिक संपत्ती गमाविणाऱ्या उद्योजकात त्यांचा दुसरा क्रमांक आहे. त्यांनी दोन महिन्यात 5.38 अब्ज डॉलर (44,618 रुपये) गमावले आहे. अंबानी 81.7 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 10 व्या स्थानी आहेत.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.