Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electoral Bonds : निवडणूक रोख्यात करा कमाई, 5 डिसेंबर पासून विक्री, अशी करा गुंतवणूक..

Electoral Bonds : निवडणूक रोख्यातून तुम्हाला आवडत्या पक्षाला निधी देता येईल, कमाई करता येईल..

Electoral Bonds : निवडणूक रोख्यात करा कमाई, 5 डिसेंबर पासून विक्री, अशी करा गुंतवणूक..
बाँडमधून कमाईची संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 12:00 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) राजकारणात पारदर्शकपणे देणगी स्वीकारण्यासाठी पुन्हा निवडणूक रोखे (Electoral Bonds) बाजारात आणले आहेत. गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) अगोदर केंद्राने निवडणूक रोखे आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शनिवारी या बाँडच्या 24 व्या हप्त्यासाठी केंद्राने मंजूरी दिली. या रोख्यांची विक्री येत्या 5 डिसेंबरपासून होणार आहे. या दिवशी गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरु होत आहे.

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) याविषयी एक निवेदन दिले आहे. त्यानुसार, निवडणूक रोख्याची विक्री येत्या 5 डिसेंबरपासून होईल. भारतीय स्टेट बँकेच्या 29 अधिकृत शाखांमधून या बाँडची खरेदी करता येणार आहे. यापूर्वी 23 व्या हप्त्यासाठी 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विक्री करण्यात आली होती.

तर त्यापूर्वी निवडणूक रोखांच्यी 22 वी फेरी पूर्ण झाली. 1 ते 10 ऑक्टोबरदरम्यान इलेक्ट्रॉल बाँड विक्री करण्यात आले. राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय लोकशाहीत निवडणूक रोख्यांचा प्रयोग करण्यात येत आहे. निवडणूक रोखे आणणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.

हे सुद्धा वाचा

या निवडणूक रोख्यातून विविध राजकीय पक्षांना निधी उभारता येतो. रोख स्वरुपात देणगीऐवजी केंद्र सरकारने हा वैकल्पिक पर्याय समोर आणला आहे. रोख्यातून जनता, संस्था त्यांच्या राजकीय पक्षासाठी निवडणूक रोखे खरेदी करु शकता.

SBI च्या शाखेतून बाँड मिळणार आहेत. बँकेच्या 29 अधिकृत शाखांमधून हे बाँड खरेदी करता येतील. त्यासाठी अर्जही भरुन द्यावा लागणार आहे. केवायसी ही पूर्ण करावे लागणार आहे. या योजनेत तुमचे नाव गुप्त ठेवता येऊ शकते.

लखनऊ, शिमला, देहरादून, कोलकत्ता, गुवाहाटी, चेन्नई, पटना, नवी दिल्ली, चंदीगड, श्रीनगर, गांधीनगर, भोपाळ, रायपूर आणि मुंबई यासह एकूण 29 अधिकृत शाखांमधून हे बाँड खरेदी करता येतील.

1 ते 10 मार्च, 2018 रोजी दरम्यान पहिल्यांदा निवडणूक रोख्यांची विक्री करण्यात आली होती. या रोख्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमेव अधिकृत बँक आहे. या बॉडच्या घोषणेनंतर ते 15 दिवसांसाठी वैध राहतील.

बाँड खरेदी करणाऱ्या संस्था अथवा नागरिकांना कर सवलत मिळते. नोंदणीकृत राजकीय पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडणूक रोख्यातून निधी जमा करता येतो. पण अशा पक्षाला निवडणुकांमध्ये 1 टक्के मते पडणे आवश्यक आहे.

स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....