कमी पैशात करा ‘हा’ कोर्स आणि स्वस्त: बनवा इलेक्ट्रिक कार, DIY ची बेस्ट बिझनेस आयडिया

आता इलेक्ट्रिक कारची विक्री वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही अधिकाधिक इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीवर भर देत आहे.

कमी पैशात करा 'हा' कोर्स आणि स्वस्त: बनवा इलेक्ट्रिक कार, DIY ची बेस्ट बिझनेस आयडिया
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 12:38 PM

नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटल विश्वात व्यवसाय करण्याच्या पद्धतीसुद्धा बदलल्या आहेत. आता इलेक्ट्रिक कारची विक्री वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही अधिकाधिक इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीवर भर देत आहे. दिल्ली सरकारने आता इलेक्ट्रिक कार वापरण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही इलेक्ट्रिक कारच्या मदतीने चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हीही इलेक्ट्रिक कारसह व्यवसाय करू शकता. (electric vehicle engineering course diyguru started course for engineering )

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत वाढ होत असताना, आता त्यांच्या मेकॅनिकचीही मागणी वाढत आहे. बर्‍याच मोठ्या कंपन्यांनाही इलेक्ट्रिक कारचे मेकॅनिक शोधत आहेत. म्हणूनच जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही मेकॅनिक बनून, एक वर्कशॉप उघडून किंवा त्यासंबंधित व्यवसाय करून चांगले पैसे मिळवू शकता. सध्या इलेक्ट्रिक मेकॅनिक आवश्यक आहे आणि ते बाजारात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.

यासाठी स्टार्टअप DIYguru ने एक ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. याद्वारे तुम्ही हा कोर्स ऑनलाईन शिकू शकता. ज्यामधून तुम्ही इलेक्ट्रिक कारशी संबंधित तांत्रिक माहिती मिळवू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला वर्कशॉपही दिलं जाईल. DIYguru एक Ed-Tech कंपनी आहे. हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून लोकांना इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रशिक्षण देतं. 2017 मध्ये कंपनीची सुरूवात झाली.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कंपनीच्या वेबसाईटवर 56 हजाराहून अधिक लोकांनी कोर्ससाठी नोंदणी केली आहे. इतकेच नाही तर बॉश, ह्युंदाई, मारुती या कंपन्यादेखील डीआयवाय कोर्सचा लाभ घेत आहेत आणि या कोर्सच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षण देत आहेत.

या कोर्समध्ये काय आहे खास?

DIY Guru चा कोर्स Automotive Skills Development Council (ASDC) आणि All India Council for Technical Education (AICTE) द्वारा प्रमाणित आहे. हा कोर्स करण्यासाठी पैसेही कमी लागतील. त्यामुळे सर्वसामान्यही यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला गाड्यांविषयी सगळी माहिती दिली जाईल. इतकंच नाही तर यातून तुम्हाला पुढे नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. (electric vehicle engineering course diyguru started course for engineering )

संबंधित बातम्या – 

प्रतीक्षा संपली, नवी 7 सीटर Tata Safari 2021 लाँच, किंमत…

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

नवी कोरी Tata Safari ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(electric vehicle engineering course diyguru started course for engineering )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.