Twitter Elon Musk : एलॉन मस्क याने टाकला बॉम्ब! पहिल्यांदाच महिलेच्या हाती ट्विटरची कमान

Twitter Elon Musk : बडे बेआब्रु होकर तेरे कुचे से हम निकले, अशी काहीशी अवस्था ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांची झाली आहे. आता त्यांनी ट्विटरची कमान एका महिलेच्या हाती देण्याची घोषणा केली आहे. कोण आहे ही नवीन सीईओ...

Twitter Elon Musk : एलॉन मस्क याने टाकला बॉम्ब! पहिल्यांदाच महिलेच्या हाती ट्विटरची कमान
मस्कचा षटकार
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 4:41 PM

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यापासून वाद आणि टीका एवढेच ते काय समीकरण उरले होते. ट्विटरचे अर्ध्यांहून अधिक कर्मचारी स्वेच्छेने, सक्तीने नोकरी सोडून गेले. अनेक ठिकाणीच कार्यालये बंद झाली. कार्यालयातील फर्निचरची ऑनलाईन विक्री करावी लागली. सर्वात कहर म्हणजे युझर्सच्याच जीवावर ट्विटर (Twitter) चालविण्याचा मस्क बाबांचा गोरखधंदा युझर्संनीच हाणून पाडला आहे. त्यामुळे बडे बेआब्रु होकर तेरे कुचे से हम निकले अशी अवस्था मस्क यांची झाली आहे. त्यांनी ट्विटरची कमान महिलेच्या हाती देण्याचे ठरवले आहे. पहिल्यांदाच ट्विटरचे नेतृत्व एक महिला करणार आहे. कोण आहे ट्विटरची ही नवीन सीईओ? (First Lady CEO Of Twitter)

6 आठवड्यात नवीन सीईओ मस्क यांनी यापूर्वीच योग्य व्यक्ती भेटल्यास त्याच्या हातात ट्विटरचा कारभार सोपविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, मस्क यांनी नवीन सीईओ मिळाल्याचे जाहीर केले. तसेच ही व्यक्ती येत्या 6 आठवड्यात काम सुरु करेल, असे जाहीर केले. मस्क यांनी महिलेच्या हातात ट्विटरची कमान देण्याचे निश्चित केले आहे. आता या नवीन सीईओची जगभरात चर्चा सुरु आहे.

कोण आहे ट्विटरची नवीन सीईओ मस्क यांनी ट्विटरची नवीन सीईओ मिळाल्याची घोषणा केल्यानंतर जगभरात त्याविषयीची चर्चा रंगली आहे. ही महिला कोण आहे, याविषयी खलबत होत आहे. एका दाव्यानुसार, एनबीसी युनिर्व्हसल कंपनीची प्रमुख लिंडा याकारिनो यांच्याकडे सीईओ पद देण्याची दाट शक्यता आहे. त्यांचेच नाव सध्या आघाडीवर आहे. वॉल्ट जर्नल नुसार, एलॉन मस्क लवकरच राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी लिंडा याकारिनो यांची नियुक्ती करण्यात येईल. मस्क चीफ एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदावर असतील.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत लिंडा याकारिनो लिंडा याकारिनो 2011पासून एनबीसी युनिर्व्हसल कंपनीसोबत जोडलेल्या आहेत. तसेच त्यांनी टर्नर या कंपनीत जवळपास 19 वर्ष काम केले आहे. या कंपनीत त्या कार्यकारी उपाध्यक्ष, सीईओ, जाहिरात प्रमख आणि इतर विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी स्टेट विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे.

सीईओ बनण्याचे स्वप्न बिझनेस इनसाईडरने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, लिंडा याकारिनो यांना ट्विटरचे सीईओ होण्याची इच्छा होती. त्यांच्या मित्रांकडे त्यांनी याविषयी अनेकदा मतं मांडलं. तसेच त्यासाठी त्यांनी यापूर्वी प्रयत्न ही केल्याचे बोलल्या जात आहे. जर मस्क यांनी विचार बदलला नाही तर त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

ऑक्टोबरमध्ये ट्विटरची खरेदी एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा सौदा केला होता. 44 अब्ज डॉलरला त्यांनी ट्विटरची खरेदी केली होती. न्यायालयीन कचाट्यातून वाचण्यासाठी इच्छा नसतानाही मस्क यांना ही खरेदी करावी लागली होती. त्याचा सूड ही त्यांनी ट्विटरवर उगारला. त्यांचे कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचे, कार्यालय बंद करण्याचे, फर्निचर विक्रीचे आणि ब्लू टिकचे निर्णय आतापर्यंत वादग्रस्त ठरले आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.