Telecom : मुकेश अंबानींच्या डोक्याला ताप, जगातील हा अरबपती टेलिकॉम सेक्टरमध्ये करणार ‘स्पेस’

Telecom : आता अंतराळात नाही तर भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात दोन दिग्गज कंपन्यांचं वॉर रंगणार आहे..

Telecom : मुकेश अंबानींच्या डोक्याला ताप, जगातील हा अरबपती टेलिकॉम सेक्टरमध्ये करणार 'स्पेस'
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 2:54 PM

नवी दिल्ली : देशात टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) नवनव्या संधी उपलब्ध होत आहे. देशात 5G चा झंझावात आलं आहे. तर आता मोबाईल सॅटेलाईट (Mobile Satellite) सेवेचाही दणका उडणार आहे. त्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात सर्वत्र कंपन्यांचं आणि संवादाचं जाळं विणल्या जाणार आहे. या क्षेत्राला कोण सुगीचे दिवस आले आहेत. भारतीय दूरसंचार क्षेत्रात विदेशी कंपन्यांही (Foreign Investor Companies) दमदार पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलॉन मस्कही (Elon Musk) भारतात मोबाईल सेवा सुरु करु शकतो. त्याने त्यासाठी दूरसंचार विभागाकडे रीतसर अर्जफाटे केले आहेत. या अब्जाधिशाची कंपनी स्पेस एक्सने (SpaceX) दूरसंचार विभागाकडे मोबाईल सॅटेलाईट सेवा सुरु करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

या मोबाईल सेवेला, ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सेटेलाइट( GMPCS) असे नाव देण्यात आले आहे. स्पेस एक्सने या GMPCS च्या परवान्यासाठी दूरसंचार विभागाकडे अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांची डोकेदुखी वाढणार की काय अशी चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

एलॉन मस्क यांना सेवेचा परवाना मिळाला तर सॅटेलाईट ब्रॉडबँडद्वारे ते सेवा देतील. त्यांच्या या सेवेचे नाव स्टारलिंक असे असेल. यापूर्वीही मस्क यांची स्टारलिंक भारतात सॅटेलाईट सेवा देणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण सरकारने कंपनीकडून रीतसर अर्ज दाखल केला नसल्याचे कारण देत या चर्चांना विराम दिला होता.

याचा अर्थ परवाना मिळाला म्हणजे लगेचच स्टारलिंकची सेवा सुरु होईल असे नाही. स्पेस एक्सला भारतात अर्थस्टेशन (Earth Station) म्हणजे टॉवर उभारण्यासाठी आणि सॅटेलाईट बँडविथची क्षमता विस्तार करावा लागेल .

भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी कंपनीला इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरकडून परवानगी घ्याव लागेल. ही भारतीय संस्था खासगी आंतरराळ संस्थाचे नियंत्रण करते.

भारताच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड क्षेत्रात मोठी क्रांती येण्याचे संकेत आहेत. 2025 पर्यंत देशातील सॅटेलाईट ब्रॉडबँडचा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. या क्षेत्रात कित्येक हजार कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. हा बाजार 13 अरब डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रात मुकेश अंबानी यांची जिओ, वन वेब, टाटा ग्रुपची नेलको आणि कॅनाडामधील टेलीसॅट आणि अॅमेझॉन या कंपन्याचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांसमोर स्पेसएक्सचे तगडे आव्हान असणार आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.