Elon Musk : Twitter मधून होत असेल कमाई तर भरा इतके टक्के GST
Elon Musk : Twitter मधून कमाई होत असेल, अथवा त्या प्रक्रियेत असाल तर आता युझर्सला कर भरावा लागणार आहे. त्यासाठी ट्विटरने पण त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्याची प्रक्रिया सुरु केली आहे. इतका टक्के जीएसटी द्यावा लागेल.
नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : सोशल मीडिया कंपनी ट्विटर (आता X) चे नवीन मालक एलॉन मस्कने (Elon Musk) प्लॅटफॉर्मवर युझर्सची संख्या आणि त्यांनी वेळ अधिक खर्ची घालावावा यासाठी अनेक सेवा सुरु केल्या आहेत. ट्विटर म्हणजे आताचे ‘X’ केवळ सोशल नेटवर्किंग, मॅसेजिंग प्लॅटफॉर्म नसेल. तर त्यावर युझर्सला बॅकिंग, पेमेंट आणि ई-कॉमर्स अशा सेवा मिळतील. हे सर्व बदल लागू झाले आहेत. त्यामुळे युझर्सला एकाच प्लॅटफॉर्मवरुन विविध सेवांचा पण लाभ घेता येईल. कंटेट जनरेट (Content Generate) करणाऱ्यांसाठी इनकम प्लॅन पण तयार केला आहे. कंपनीने युझर्ससाठी जाहिरातीपासून होणाऱ्या कमाईचा हिस्सा देण्यासाठी एक ‘एड रिव्हेन्यू शेअरिंग प्लॅन’ तयार केला आहे. पण अशा कमाईवर त्यांना कर भरावा लागेल. भारतात अशा कंटेट कर्त्यांना वस्तू आणि सेवा कर चुकता करावा लागेल. त्याची मर्यादा पण निश्चित झाली आहे.
किती द्यावा लागेल जीएसटी
कंपनीने युझर्ससाठी जाहिरातीपासून होणाऱ्या कमाईचा हिस्सा देण्यासाठी एक ‘एड रिव्हेन्यू शेअरिंग प्लॅन’ तयार केला आहे. त्यात या कमाईवर वापरकर्त्यांना 18 टक्के दराने कर द्यावा लागेल. कारण ही कमाई परदेशी स्त्रोत मानण्यात येईल. त्याआधारे त्यावर 18 टक्के दराने जीएसटी भरावा लागेल.
या उत्पन्नावर पण कर
जर एखादी व्यक्ती रेंटल, बँकेतील मुदत ठेवीवरील व्याज वा इतर व्यावसायिक सेवांच्या माध्यमातून वर्षाभरात 20 लाख रुपयांपेक्षा अधिकची कमाई करत असेल तर त्यांना जीएसटी काही अटींवर भरावा लागू शकतो. उत्पन्न जीएसटीत येत असेल तर ते चुकते करावे लागेल. तर उत्पन्न करपात्र असेल तर कर भरावा लागेल. उत्पन्नावर जितकी सवलत असेल, त्यावर कर द्यावा लागणार नाही.
ऑफिस फर्निचरची विक्री
ट्विटरशी (Twitter) संबंधित सर्व वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे .यापूर्वीच्या वस्तूंची विक्री करण्याचा त्याने चंग बांधला आहे. मस्क याने ट्विटरचे नाव त्याने बदलले. ट्विटरचे नाव एक्स ठेवले. लोगो बदलला. अनेक कर्मचारी काढले. गेल्यावेळी पण अनेक वस्तूंची विक्री केली. त्याने पुन्हा ट्विटरचे सामान विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन लिलाव (Online Auction) होणार आहे. त्याची तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.
12 सप्टेंबरपासून लिलाव
एलॉन मस्क याने ट्विटरशी संबंधीत सर्व सामानाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सामानाचा लिलाव करण्यात येणार आहे. कार्यालयाच्या साईनबोर्डपासून ते खुर्ची, टेबलपर्यंत सर्वच वस्तूंची विक्री होईल. 12 सप्टेंबरपासून लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. ट्विटरचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय त्याच्या पथ्यावर पडला. ही नवीन ओळख फायद्याची ठरली. मस्क याने ट्विटरचा लोगो बदलवून तो ‘X’ असाच केला नाही तर नवीन डोमेन X.com पण सुरु केले.