Elon Musk : देर आए दुरुस्त आए, मस्क झाला मेहरबान, ट्विटरचे उघडले दार, या तज्ज्ञांना नोकरीची संधी..

Elon Musk : ट्विटरने कर्मचारी कपातीनंतर आता कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला आहे..

Elon Musk : देर आए दुरुस्त आए, मस्क झाला मेहरबान, ट्विटरचे उघडले दार, या तज्ज्ञांना नोकरीची संधी..
नोकरीची संधीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 6:35 PM

नवी दिल्ली : Twitter ने तज्ज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांसाठी दार उघडले आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा मिळविल्यापासून ट्विटरमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. अजूनही ती सुरुच आहे. पण यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीवर पाणी (Lay Off) सोडावे लागले. मस्कने जवळपास 5000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. तसेच इतर काही निर्णय हे युझर्सला डोकेदुखी ठरले. पण आता मस्कला उपरती झाली आहे. त्याने कर्मचारी भरतीचा (Hiring) निर्णय घेतला आहे.

मस्क यांनी सध्या ट्विटर 2.0 साठी कंबर कसली आहे. मायक्रो ब्लॉगिंग या प्लॅटफॉर्मवर मस्कने त्याचे विचार, धोरणं आणि योजना यांची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, ट्विटरमध्ये मोठे फेरबदल होत आहे.

सर्वात मोठा बदल हा फीचर्समध्ये होत आहे. वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. एवढेच नाही तर कुशल आणि तांत्रिक मनुष्यबळाची ट्विटरला आवश्यकता आहे. त्यामुळे लवकरच कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीने अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. त्यामुळे कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. तर अनेक देशात टीमच सोडून गेल्याने ट्विटरचे कामकाज प्रभावित झाले आहे. त्यासाठी ही नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

ट्विटर 2.0-द एव्हरिथिंग अॅपसाठी कर्मचारी भरती सुरु करण्यात आल्याची माहिती मस्कने दिली. त्याने ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार तांत्रिक आणि अनुभवी लोक ट्विटरसोबत जोडल्या जात आहेत.

एका बैठकीदरम्यान कंपनीच्या जवळपास 1200 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी एका झटक्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर मस्कने कोडिंगचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती सुरु केली होती.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्यांचे दार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जपान, भारत, इंडोनेशिया आणि ब्राझील यासाठी नवीन सॉफ्टवेअर अभियंत्यांची मोठी फळी उभारण्यात येत आहे. तसेच विपणन व्यवस्थापनातही मोठी भरती राबविण्यात येईल.

मस्कच्या दाव्यानुसार, ट्विटरच्या अॅक्टिव वापरकर्त्यांची संख्या अद्यापही उच्चस्तरावर आहे. सध्या हेट स्पीचच्या ट्विटची संख्या घसरली आहे. ट्विटर 2.0 मध्ये व्हिडिओ आणि जाहिरातीवर जोर देण्यात येत आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.