Elon Musk : ..तरी होईना समाधान! एलॉन मस्क, ट्विटरसंबंधीचे सर्व सामान विकणार
Elon Musk : जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याने ट्विटर आतून-बाहेरुन बदलण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी तो ट्विटरसंबंधीच्या या वस्तूंची विक्री करणार आहे. गेल्या वर्षी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर त्याने कार्यालय बंद करण्याचा सपाटा लावला. तिथल्या वस्तूंची विक्री केली.
नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : ट्विटरशी (Twitter) संबंधित सर्व वस्तूंची विक्री होणार आहे. जगातील अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) याने ट्विटर चकाचक करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी यापूर्वीच्या वस्तूंची विक्री करण्याचा त्याने चंग बांधला आहे. ट्विटरचे नाव त्याने बदलले. ट्विटरचे नाव एक्स ठेवले. लोगो बदलला. अनेक जुनी कर्मचारी काढली. त्यावेळी जगभरातील काही कार्यालये बंद केली. त्यातील सामानांची विक्री केली. पण मस्क याचे मन काही भरत नसल्याचे दिसते. त्याने पुन्हा ट्विटरचे सामान विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन लिलाव (Online Auction) होणार आहे. यामध्ये कॉफी टेबल, लार्ज बर्ड केज, व्हायरल फोटो यांचा समावेश आहे. दुसऱ्या उत्पादनांत टेबल, खुर्ची, डीजे बुथ, वाद्य यांचा लिलाव होईल. लिलावाची तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.
12 सप्टेंबरपासून लिलाव प्रक्रिया
जगातील अब्जाधीश, सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने ट्विटरशी संबंधीत सर्व सामानाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सामानाचा लिलाव करण्यात येणार आहे. कार्यालयाच्या साईनबोर्डपासून ते खुर्ची, टेबलपर्यंत सर्वच वस्तूंची विक्री होईल. 12 सप्टेंबरपासून लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
ट्विटर रिब्रँडिंग
या लिलावाला ट्विटर रिब्रँडिंग असे नाव देण्यात आले आहे. लिलाव पूर्णपणे ऑनलाईन असेल. यामध्ये ट्विटरशी संबंधित अनेक जुन्या वस्तू पण असतील. कार्यालयातील अनेक गोष्टींचा लिलाव करण्यात येणार आहे. BBC रिपोर्टनुसार, लिलाव दोन दिवस चालेल. यामधील वस्तूंच्या बोलीची रक्कम 25 डॉलर म्हणजे जवळपास 2100 रुपयांपासून सुरु होईल.
या वस्तूंचा लिलाव
ऑनलाईन लिलावात ट्विटरशी संबंधित 584 वस्तू असतील. यामध्ये कॉफी टेबल, लार्ज बर्ड केज, व्हायरल फोटो यांचा समावेश आहे. दुसऱ्या उत्पादनांत टेबल, खुर्ची, डीजे बुथ, वाद्य यांचा लिलाव होईल. अनेक पोस्टची छायाचित्र, काही पुरस्कारांची छायाचित्र यांचा यामध्ये समावेश आहे.
परफ्युम बाजारात
गेल्या वर्षी एलॉन मस्क यांनी Burn Hair या नावाने परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. या परफ्युची किंमत 100 डॉलर होती. या परफ्युमची खूप चर्चा झाली होती. टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत आहेत. त्यांनी नुकतेच ट्विटर ताब्यात घेतले आहे. सध्या मस्क यांची संपत्ती 187 दशलक्ष डॉलर आहे.
बिअर पण लोकप्रिय
अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाने ही बिअर लाँच केली आहे. बिअरची झलक मद्यप्रेमींना खुणावत आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात 8,000 रुपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.