AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Twitter : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे..’ मस्क साहेबांचा अचानक यू-टर्न, या आपुलकी मागे दडलंय तरी काय..

Twitter : घाई-घाईत कर्मचारी कपातीचा निर्णय तर घेतला, पण मस्क यांच्यावर आता पश्चातापाची वेळ आली आहे..त्यामागची कारणं तरी काय आहेत..

Twitter : 'या चिमण्यांनो परत फिरा रे..' मस्क साहेबांचा अचानक यू-टर्न, या आपुलकी मागे दडलंय तरी काय..
भावांनो, परत या की..Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 4:29 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत आणि उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) याने ट्विटरवर (Twitter) मांड ठोकल्यानंतर काही झटपट निर्णय घेतले. त्याच्या निर्णयाने वापरकर्त्यांना (Users) जसा मनःस्ताप झाला. त्यापेक्षा जास्तक फटका कर्मचाऱ्यांना (Employees) झाला. मस्कने ताबडतोब कर्मचाऱ्यांची कपात (Lay-Off) सुरु केली. त्यांना घरी पाठवले खरे, पण तीनच दिवसात त्याने भूमिका बदलली. त्याच्या या यू-टर्न मागील कारणं तरी काय आहेत..

Elon Musk ने ट्विटरमधील जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना, ऑफिसला निघाला असाल तर घरीच थांबा असा मेल पाठवून नोकरीवरुन कमी केले होते. त्याच्या या भूमिकेवर जगभरातून टीका सुरु झाली. पण अवघ्या तीन दिवसातच मस्कने यू-टर्न घेतला.

मस्कने ट्वीट करत कर्मचारी कपातीबाबतची भूमिका मांडली होती. कंपनीला 4 दशलक्ष डॉलरचे नुकसान होत असल्याने दुसरा पर्याय समोर दिसत नाही. कर्मचाऱ्यांची कपात आवश्यक असल्याचा धोशा त्याने लावला होता.

हे सुद्धा वाचा

तसेच कपातीनंतरही कर्मचाऱ्यांची कंपनी काळजी घेत असल्याचा दावा केला होता. कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली असली तरी त्यांना पुढील 3 महिन्यांचे वेतन अदा करण्यात येत आहे. नियमानुसार ही रक्कम 50% अधिक असल्याचा त्याचा दावा होता.

पण अनुभवी कर्मचारी कपातीमुळे ट्विटरच्या दैनंदिन कामकाजावर तात्काळ परिणाम दिसून येऊ लागला. तसेच पुढील काही नाविन्यपूर्ण फीचर्ससाठी हा कर्मचारी वर्ग महत्वाची भूमिका बजावू शकत असल्याचे वेळीच मस्कच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

त्यानंतर कर्मचारी कपातीत घाई झाल्याचे मान्य करत, ट्विटरने कर्मचाऱ्यांना ‘Please Come Back‘ चे आवाहन केले. अर्थात यामागे ट्विटरचा डोलारा एका दमात कोसळू नये याची काळजी मस्क यांना काळजी असल्याचे बोलल्या जात आहे.

अर्थात आता किती कर्मचाऱ्यांना ट्विटरने माफी मागून कामावर बोलावले आहे, याची शहानिशा झालेली नाही. पण अनेक कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्याची विनंती कंपनीने केल्याची चर्चा आहे.

भारतीय सीईओ पराग अग्रवाल आणि अन्य दोघांना कामावरुन काढून टाकत मस्क यांनी कर्मचारी कपातीची मोहिम राबविली होती. काही वृत्तानंतर ट्विटरने भारतातील 250 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.