Elon Musk : भाऊ एकदम फार्मात! एलॉन मस्क याची जागतिक श्रीमंतांच्या यादीत डबल सेंच्युरी

Elon Musk : एलॉन मस्क सध्या एकदम फार्मात आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत मस्कने झेंडे गाडले. पण या यादीत नावाजलेल्या या दोन श्रीमंतांना टॉप-10 चा टप्पा गाठता आला नाही.

Elon Musk : भाऊ एकदम फार्मात! एलॉन मस्क याची जागतिक श्रीमंतांच्या यादीत डबल सेंच्युरी
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 3:34 PM

नवी दिल्ली : टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटर सारख्या कंपन्यांच्या मालक एलॉन मस्कचे (Elon Musk) नशीब सध्या जोरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जागतील सर्वाधिक श्रीमंत फ्रान्सचे बिझनेस टायकून अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांच्यावर कुरघोडी चालवली आहे. त्यांनी अर्नाल्ट यांना मागे टाकले होते. आता त्यांनी आणखी एक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. मस्क यांची एकूण संपत्ती आता पुन्हा 200 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. संपत्तीत घसरण झाल्याने अर्नाल्ट आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण या यादीत नावाजलेल्या या दोन श्रीमंतांना टॉप-10 चा टप्पा गाठता आला नाही.

इतकी झाली संपत्ती ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार, जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत गेल्या 24 तासात 2.60 अब्ज डॉलरचा नफा झाला. त्यामुळे आता त्यांची एकूण संपत्ती 202अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मस्क यांच्या संपत्तीत वाढ सुरुच आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा जागतिक श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

Tesla च्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअरमध्ये तुफान वाढ झाली. सोमवारी Tesla Inc Stock मध्ये 3.06 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 220.52 डॉलर प्रति शेअरवर बंद झाला. गेल्या एक महिन्यापासून टेस्लाच्या स्टॉकच्या किंमतीत 28.37 टक्के तेजी दिसून आली. गेल्या पाच दिवसांत या शेअरचा भाव 10.26 टक्के वाढला.

हे सुद्धा वाचा

अर्नाल्ट दुसरे श्रीमंत टॉप-10 बिलेनिअर्सच्या यादीत एलॉन मस्क यांच्या नंतर आता दुसऱ्या स्थानावर बर्नार्ड अर्नाल्ट दुसऱ्या स्थानावर आहेत. शेअरमधील घसरणीचे मोठं नुकसान अर्नाल्ट यांना होत आहे. आज दुपारी नेटवर्थमध्ये 2.90 अब्ज डॉलरची घसरण झाली. त्यांचे नेटवर्थ 188 अब्ज डॉलरवर आले.

टॉप-10 मध्ये कोण ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार टॉप-10 मध्ये जेफ बेजोस (Jeff Bezos) 149 अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर, बिल गेट्स (Bill Gates) 129 अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर, लॅरी एलिसन (Larry Ellison) 120 अब्ज डॉलरसह पाचवे आणि स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer) 116 अब्ज डॉलर सहाव्या स्थानावर आहेत. वॉरेन बफे (Warren Buffett) 115 अब्ज डॉलर नेटवर्थसह 7 व्या स्थानावर, लॅरी पेट (Larry Page) 114 अब्ज डॉलरसह 8 व्या स्थानावर, सर्गेई ब्रिन (Sergey Brin) 108 अब्ज डॉलरसह नवव्या स्थानावर आणि मार्क झुगरबर्ग (Mark Zuckerberg) 98.9 अब्ज डॉलरसह 10 व्या स्थानावर आहेत.

अंबानी-अदानी यादीबाहेर रिलायन्स इंड्रस्टीचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 375 दशलक्ष डॉलरच्या फायदा होऊन 85 अब्ज डॉलर झाली. ते आता 13 व्या स्थानावर आहेत. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकूण 136 दशलक्ष डॉलरची वृद्धी झाली. अदानी 61.7 अब्ज डॉलर नेटवर्थ सह श्रीमंतांच्या यादीत 19 व्या क्रमांकावर आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.