कोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती

EPFO new Jobs | या आकडेवारीनुसार संघटित क्षेत्रात सध्या मोठी रोजगारनिर्मिती सुरु असल्याचे दिसत आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात EPFO मध्ये एकूण 77.08 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. गेल्यावर्षी हीच संख्या 78.58 लाख इतकी होती.

कोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती
संघटित क्षेत्रात सध्या मोठी रोजगारनिर्मिती सुरु आहे.
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 12:31 PM

नवी दिल्ली: एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था मंदावली असताना देशात याच काळात मोठ्याप्रमामावर रोजगारनिर्मिती झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत: एप्रिल महिन्यात कंपन्यांनी बंपर नोकरभरती केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) माहितीनुसार एप्रिल 2021 मध्ये नव्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 13.73 टक्के म्हणजे 12.76 लाखांची इतकी वाढ झाली. तर मार्च महिन्यात 11.22 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या. केंद्रीय श्रम विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. (EPFO registration shows major recuritment in April 2021)

या आकडेवारीनुसार संघटित क्षेत्रात सध्या मोठी रोजगारनिर्मिती सुरु असल्याचे दिसत आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात EPFO मध्ये एकूण 77.08 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. गेल्यावर्षी हीच संख्या 78.58 लाख इतकी होती.

एप्रिलमध्ये पीएफ अकाऊंट बद करणाऱ्यांची संख्या कमी

या आकडेवारीनुसार मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल महिन्यात पीएफ अकाऊंट बंद करणाऱ्यांचा आकडा 87,821 ने कमी झाला. तर पीएफ अकाऊंट पुन्हा सुरु करणाऱ्यांची संख्या 92,864 इतकी होती.

6.89 लाख नवे सदस्य

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात EPFO नोंदणी करणाऱ्यांमध्ये 2,84,576 इतकी घट झाली होती. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती ओढावली होती.

EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय?

कोरोना संकटामुळे कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने नोकरदारांसाठी अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच नोकरदारांना त्यांच्या खात्यातील भविष्य निर्वाह निधीपैकी (PF) 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर EPFO ने पीएफ धारकांना त्यांच्या खात्यातून आगाऊ (Advacne) रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे ही रक्कम परत करावी लागणार नाही. त्यामुळे पीएफधारकांना संकटाच्या काळात मोठी मदत होणार आहे.

1. EPFO च्या घोषणेनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना EPFO खात्यातून आगाऊ पैसे काढले होते त्यांना आता दुसऱ्यांदा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. EPFO खात्यातील 75 टक्के रक्कम किंवा मूळ वेतन व महागाई भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे पीएफधारकांना खात्यामधून काढता येतील.

2. कोरोनाच्या काळात ज्यांची नोकरी गेली आहे, जे लोक एका महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार आहेत ते पीएफधारक आपल्या खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात.

3. EPFOच्या ईडीएलआय (EDLI scheme) योजनेतंर्गत विम्याचा लाभ सात लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पीएफधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला सात लाख रुपये मिळतील.

4. EPFO खाते आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार ईपीएफओ खात्याशी लिंक न केल्यास कंपन्यांना पीएफ खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.

5. एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडल्यानंतरही तो आपल्या ईपीएफओ खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकतो.

संबंधित बातम्या:

नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली

नोकरदारासांठी मोठी बातमी, EPFO 6 कोटी खातेधारकांना ‘या’ कारणामुळे पैसे पाठणार

PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम

(EPFO registration shows major recuritment in April 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.