PF खातेधारकांसाठी EPFO चा मोठा निर्णय, कोरोना संकटात ‘या’ सुविधेद्वारे 3 दिवसांत पैसे खात्यात जमा करणार
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये ईपीएफओनं खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. EPFO Covid 19 Advance scheme
नवी दिल्ली: कोरोनाविषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या काळात केंद्र सरकारने ईपीएफओ खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ अकाउंट मधून तीन महिन्याची जमा रक्कम अॅडव्हान्स स्वरूपात काढण्यासाठी मुभा दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत देखील सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. (EPFO decided to give relief to pf account holders to withdraw 3 months advance salary via corona non-refundable service)
नेमकी किती रक्कम काढता येईल?
ईपीएफओने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खातेधारक कर्मचारी कोविड-19 अॅडव्हान्स सुविधेचा वापर करून पैसे काढू शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेल्या रकमेपैकी 75 टक्के किंवा तीन महिन्यांच्या मूळ पगाराच्या बरोबरची रक्कम काढता येईल. यासंदर्भात केंद्रीय श्रम मंत्रालयानं एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.
कोरोनापासून वाचण्यासाठी मदतीचा दिलासा
ईपीएफओने अॅडव्हान्स पेमेंट देण्याचे कारण म्हणजे कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे हे आहे. कोरोनाच्या काळात ज्यांच्या कामावर प्रभाव झाला आहे, खर्च वाढलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना पैशाची अडचण भासू नये म्हणून सरकारने पीएफ खात्यामधील रक्कम अॅडव्हान्स स्वरूपात काढण्यास मुभा दिली आहे.
15 हजारांपेक्षा वेतन कमी असणाऱ्यांनी घेतला लाभ
कोविड-19 अॅडव्हान्स सुविधेचा लाभ गेल्या वर्षी देखील दिला गेला होता. त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 15000 पेक्षा कमी आहे अशा 76. 31 लाख लोकांनी लाभ घेतला होता. त्यांनी कोविड-19 नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स काढलेला होता. त्या सुविधेअंतर्गत त्यावेळी 18698.15 कोटी रुपये काढले गेले होते.
तीन दिवसात पैसे पाठवण्यचा प्रयत्न
कोरोना महामारीच्याच्या काळात खातेधारकांना पैसे मिळण्यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून ईपीएफओकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. खातेधारकांनी केलेल्या क्लेमची तातडीने पडताळणी करून ते मंजूर केले जात आहेत. यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. यामुळे क्लेम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात तीन दिवसात पैसे पाठवले जात आहेत.
Breaking : ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार?’ खासदार संभाजीराजेंचा सवाल https://t.co/d3T9C61mvZ @YuvrajSambhaji @OfficeofUT @Dev_Fadnavis @ChDadaPatil @NANA_PATOLE #MarathaReservation #SambhajirajeChatrapati #SambhajiRajeTweet #mahavikasaghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या:
नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे
PF Account मध्ये अशी अपडेट करा बँकेची माहिती; फक्त तीन टप्पे आणि काम फत्ते
(EPFO decided to give relief to pf account holders to withdraw 3 months advance salary via corona non-refundable service)