PF चे ‘हे’ काम आजच करा, ELI योजनेचा लाभ मिळणार नाही

EPFO ELI Benefits: तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ELI योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) चालू करावा लागेल आणि त्यांच्या बँक खात्यांशी आधार लिंक करावा लागेल. हे आजच करा कारण आजच शेवटची तारीख आहे.

PF चे ‘हे’ काम आजच करा, ELI योजनेचा लाभ मिळणार नाही
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 1:45 PM

तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ELI योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) चालू करावा लागेल आणि त्यांच्या बँक खात्यांशी आधार लिंक करावा लागेल. हे आजच करा कारण आजच शेवटची तारीख आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

काय आहे ELI योजना?

ELI योजना रोजगार निर्मिती सुलभ करण्यासाठी आणि कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे. दोन वर्षांच्या कालावधीत देशात दोन कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

येत्या पाच वर्षांत 4.1 कोटी युवकांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) या तीन योजना जाहीर केल्या आहेत.

EPFO सदस्यांकडे रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता कमी वेळ शिल्लक आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 नुसार, ELI योजनेत सहभागी होण्यासाठी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) चालू करणे आणि आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. यासाठी 30 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे, अर्थात आजचा हा शेवटचा दिवस आहे.

आधार ओटीपी (वन टाइम पासवर्ड) वापरून UAN अ‍ॅक्टिव्हेशन प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने घरबसल्या आपले UAN ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात.

UAN चालू कसे करावे?

सर्वप्रथम EPFO मेंबरशिप पोर्टलवर जा.

आता “महत्वाची लिंक” अंतर्गत “UAN सक्रिय करा” लिंकवर क्लिक करा.

यानंतर UAN नंबर, आधार नंबर, नाव, जन्मतारीख आणि आधार लिंक्ड मोबाईल नंबर यासारखे डिटेल्स भरा.

EPFO च्या सर्व डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे याची खात्री करावी.

आधार आधारित OTP पडताळणीसाठी आपली संमती द्या.

आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP मिळवण्यासाठी आता “गेट ऑथोरायझेशन पिन” वर क्लिक करा.

UAN अ‍ॅक्टिव्हेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरवर प्राप्त OTP भरा.

यशस्वी अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवला जाईल.

तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही या व्हिडिओची मदत घेऊ शकता.

दुसऱ्या टप्प्यात UAN अ‍ॅक्टिव्हेशनमध्ये फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीद्वारे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनच्या अद्ययावत सुविधेचा समावेश करण्यात येणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.