EPFO : PF खातेदारांची बल्ले बल्ले, प्रतिक्षा फळाला, व्याजाची रक्कम मिळणार, खाते तपासले का?
EPFO : पीएफ खातेदारांची प्रतिक्षा एकदाची फळाला आली आहे..
नवी दिल्ली : देशभरातील 7 कोटी पीएफधारकांसाठी (PF Account Holder) अखेर आनंद वार्ता आलीच. पीएफ खात्यावरील व्याज दराची (Interest Rate) घोषणा केल्यापासून व्याजाची प्रतिक्षा होती. अखेर केंद्र सरकारने दिवाळीनंतर कर्मचाऱ्यांना (Employees) ही भेट दिलीच.
यंदा व्याजदर घटल्याने पीएफ खातेधारक नाराज आहेत. पण व्याजाचा दर अत्यंत कमी झाला, असे ही नाही. आता पीएफमची रक्कम खात्यात जमा होणार असल्याने खातेदारांना सुखद धक्का बसणार आहे. अनेक महिन्यांपासून व्याजाची प्रतिक्षा होती.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund) पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. केंद्र सरकार खातेदारांच्या (EPFO Account Holder) खात्यात आर्थिक वर्ष 2022 चे व्याज हस्तांतरीत करत आहे.
देशातील EPFO च्या 7 कोटी सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम काही तासात जमा होईल. यंदा 8.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे. त्याआधारे तुमच्या एकूण रक्कमेवर व्याजाची रक्कम जमा होईल.
The process of crediting interest is ongoing and it will get reflected into your account soon. Whenever the interest is credited, it will be paid in full. There will be no loss of interest.
— EPFO (@socialepfo) October 31, 2022
जर तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये असतील तर व्याजाचे 81,000 रुपये जमा होतील. खात्यात 7 लाख रुपये असतील तर 56,700 रुपये जमा होतील. तुमच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर व्याजापोटी 8,100 रुपये जमा होतील.
एसएमएस सेवेद्वारे EPFO खात्यात किती रक्कम सध्या शिल्लक आहे आणि व्याजानंतर किती रक्कम जमा होईल हे खातेदाराला तपासता येते. त्यासाठी पर्याय आहे. एसएमएस, मिस्ड कॉल याद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होते.
EPFO सदस्य, ज्यांचे UAN सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक एसएमएसद्वारे (SMS) मिळवता येईल.
खातेदाराला 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” या मजकुरासह एसएमएस पाठवावा लागेल. भाषेचा पर्यायही तुम्हाला निवडता येतो. इंग्रजीत माहिती हवी असल्यास ‘ENG’, तामिळसाठी ‘TAM’, बंगालीसाठी ‘BEN’, हिंदीसाठी ‘HIN’ लिहू शकता. ही सेवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
तुमचे UAN तुमचे बँक खाते, आधार आणि PAN शी लिंक करायला विसरू नका. कारण EPFO त्याच्या सदस्यांचे तपशील संग्रहित ठेवते. तुम्ही नियोक्त्याला तुमच्यासाठी सीडिंग करण्यास सांगू शकता.
मिस्ड कॉल सेवेद्वारे EPFO बॅलन्स तपासता येते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स तपासता येतो. तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन कॉल करावा लागेल.