6 कोटी नोकरदारांना ईपीएफओचा दिलासा, नोकरी गमावली असली तरी PF खात्यातून 75 टक्के रक्कम काढण्याची संधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं कोरोना काळात नोकरी सोडलेल्या किंवा गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घतेला आहे.

6 कोटी नोकरदारांना ईपीएफओचा दिलासा, नोकरी गमावली असली तरी PF खात्यातून 75 टक्के रक्कम काढण्याची संधी
EPFO
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 3:32 PM

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं कोरोना काळात नोकरी सोडलेल्या किंवा गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घतेला आहे. ईपीएफओच्या माहितीनुसार ज्या खातेधारकांनी काही कारणामुंळे नोकरी गमवाली आहे आणि जे अजूनही दुसऱ्या कंपनीत रुजू झाले नाहीत. ते कोविड 19 अ‌ॅडव्हान्स सुविधेद्वारे खात्यातील जमा रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम काढू शकतात. ( EPFO members can now get benefit of Covid Advance Facility after job loss Check details here)

EPFO च्या नियमांनुसार पीएफ अ‌ॅडव्हान्स नियमानुसार खातेधारक त्यांच्या खात्यातून रक्कम काढू शकतात. केंद्र सरकारनं कोरोना काळात कोविड-19 अ‌ॅडव्हान्स सुविधा सुरु केली आहे. पीएफ खातेधारक त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 75 टक्के पैसे किंवा तीन महिन्यांचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता यापेक्षा जी कमी रक्कम असेल ती काढता येते. ईपीएफओने या माध्यमातून बेरोजगारांना मदत करण्याचा आणि सोबतच त्यांचं पीएफ सदस्यत्व सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

कोरोनापासून वाचण्यासाठी मदतीचा दिलासा

ईपीएफओने अ‌ॅडव्हान्स पेमेंट देण्याचे कारण म्हणजे कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे हे आहे. कोरोनाच्या काळात ज्यांच्या कामावर प्रभाव झाला आहे, खर्च वाढलेले आहेत आणि ज्यांनी नोकरी गमावलेली आहे, अशा खातेदारांना पैशाची अडचण भासू नये म्हणून सरकारने पीएफ खात्यामधील रक्कम अ‌ॅडव्हान्स स्वरूपात काढण्यास मुभा दिली आहे.

15 हजारांपेक्षा वेतन कमी असणाऱ्यांनी घेतला लाभ

कोविड-19 अ‌ॅडव्हान्स सुविधेचा लाभ गेल्या वर्षी देखील दिला गेला होता. त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 15000 पेक्षा कमी आहे अशा 76. 31 लाख लोकांनी लाभ घेतला होता. त्यांनी कोविड-19 नॉन रिफंडेबल अ‌ॅडव्हान्स काढलेला होता. त्या सुविधेअंतर्गत त्यावेळी 18698.15 कोटी रुपये काढले गेले होते.

तीन दिवसात पैसे पाठवण्यचा प्रयत्न

कोरोना महामारीच्याच्या काळात खातेधारकांना पैसे मिळण्यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून ईपीएफओकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. खातेधारकांनी केलेल्या क्लेमची तातडीने पडताळणी करून ते मंजूर केले जात आहेत. यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. यामुळे क्लेम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात तीन दिवसात पैसे पाठवले जात आहेत.

आधार लिंक करणं आवश्यक

ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ईपीएफ अकाउंट आधारशी लिंक केलेलं नाही त्यांना लवकर हे करावं लागेल. अन्यथा पीएफ खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी देखील अडचण येऊ शकते. इतकंच नाही तर आधार लिंक नसेल तर पीएफ खातेधारकाचा ECR देखील दाखल होणार नाही.

संबंधित बातम्या:

नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे

PF Account मध्ये अशी अपडेट करा बँकेची माहिती; फक्त तीन टप्पे आणि काम फत्ते

( EPFO members can now get benefit of Covid Advance Facility after job loss Check details here)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.